AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: विराटचा पहिल्या वनडेआधी मोठा निर्णय, न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्याआधी काय झालं?

IND vs NZ 1st Odi Virat Kohli : भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सामन्याच्या काही तासांआधी सरावात सहभागी झाला नाही. जाणून घ्या या मागील कारण.

IND vs NZ: विराटचा पहिल्या वनडेआधी मोठा निर्णय, न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्याआधी काय झालं?
Virat Kohli Indian Cricket TeamImage Credit source: PTI
| Updated on: Jan 11, 2026 | 3:41 PM
Share

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिला सामना हा बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा या स्टेडियममधील पहिला सामना असणार आहे. या सामन्याच्या 1 दिवसआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट्समध्ये जोरदार सराव केला. मात्र  भारतीय फलंदाज विराट कोहली याने सराव सत्राबाबत मोठा निर्णय घेतला. विराट कायमच नेट्समध्ये जास्तीत जास्त सराव करत असतो. मात्र विराटने पहिल्या सामन्याच्या काही तासांआधी घेतलेल्या अशा निर्णयामुळे चाहत्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विराट या सराव सत्रात सहभागी झाला नाही. मात्र विराटने तसा निर्णय का घेतला? हे आपण जाणून घेऊयात.

विराटच्या निर्णयामुळे चाहत्यांना झटका

न्यूझीलंड विरूद्धच्या सलामीच्या सामन्याआधी कर्णधार शुबमन गिल, रोहित शर्मा, केएल राहुल या अनुभवी खेळाडूंनी कसून सराव केला. ऋषभ पंत, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे देखील सरावासाठी उपस्थित होते. हा सराव ऐच्छिक होता. सराव सत्र बंधनकारक नव्हता. त्यामुळे विराटने सराव न करण्याचा निर्णय घेतला.

विराटच्या कामगिरीकडे लक्ष

न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. विराट गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खोऱ्याने धावा करत आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत सलग तिन्ही सामन्यांत 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 शतकं आणि 1 अर्धशतक लगावलं होतं.

त्यानंतर विराटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही धमाका केला त्यामुळे विराटकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा असणार आहे. तसेच विराट 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांपासून फार जवळ आहे. विराटला त्यासाठी फक्त 25 धावांची गरज आहे.

सराव सत्रात टीम इंडियाने काय केलं?

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने बॅटिंग सुधारण्यासाठी रोहित शर्माकडून सल्ला घेतला. ऋषभ पंतला सरावादरम्यान दुखापत झाली. पंतला दुखापतीमुळै मैदानाबाहेर जावलं लागलं.

उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांनी एकत्र फलंदाजीचा सराव केला. तसेच कर्णधार शुबमन गिल याने निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासह बराच वेळ संवाद साधला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...