IND vs NZ – Virat Kohli फॉर्ममध्ये आहे, सेंच्युरी मारतोय पण अजूनही एका बॉलरसमोर त्याचं काहीच चालत नाहीय

IND vs NZ -सलग दोन विजयांमुळे टीम इंडियाच मनोबल नक्कीच वाढलं आहे. पण टीमचा स्टार बॅट्समन विराट कोहलीला एका बॉलरने हैराण केलय. विराट त्याच्यासमोर हतबल ठरतोय.

IND vs NZ - Virat Kohli फॉर्ममध्ये आहे, सेंच्युरी मारतोय पण अजूनही एका बॉलरसमोर त्याचं काहीच चालत नाहीय
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 8:36 AM

रायपूर – न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसरा वनडे सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. हैदराबादमध्ये पहिल्या वनडे सामन्यात बॅट्समननी सरस कामगिरी केली होती. रायपूरच्या दुसऱ्या वनडेत बॉलर्सनी कमाल केली. न्यूझीलंडच्या संपूर्ण टीमला फक्त 108 रन्समध्ये ऑलआऊट केलं. टीम इंडियाने अगदी सहजपणे विजयी लक्ष्य गाठलं. सलग दोन विजयांमुळे टीम इंडियाच मनोबल नक्कीच वाढलं आहे. पण टीमचा स्टार बॅट्समन विराट कोहलीला एका बॉलरने हैराण केलय. विराट त्याच्यासमोर हतबल ठरतोय.

विराटकडे अजूनही उत्तर नाही

मागच्या 3 वर्षांपासून धावांसाठी झगडणारा विराट कोहली आता फॉर्ममध्ये आलाय. बॉलर्सचा तो आपल्या जुन्या स्टाइलमध्ये समाचार घेतोय. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. शतकी खेळी सुद्धा करतोय. फक्त स्पिनर्स विरुद्ध खेळताना तो अजून चाचपडतोय. या समस्येवर त्याला अजून म्हणावी तशी मात करता आलेली नाही. खासकरुन डावखुऱ्या स्पिनर्ससमोर त्याची कमजोरी उघडी पडतेय. त्यांच्यासमोर अजूनही विराटच फार काही चालत नाहीय. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात तो स्पिन बॉलिंगसमोर फेल ठरला.

हे सुद्धा वाचा

आधी बॅकफुटवर फेल

हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेसामन्यात टीम इंडियाची पहिली बॅटिंग होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली पार्ट्नरशिप केली. त्यानंतर विराट कोहलीकडे मोठी इनिंग खेळण्याची संधी होती. एक चौकार मारुन त्याने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर न्यूझीलंडचा डावखुरा स्पिनर मिचेल सँटनर गोलंदाजीला आला. त्याने स्टम्पच्या लाइनवर फुल लेंथ चेंडू टाकला. कोहलीने चेंडू फ्रंट फुटवर येऊन खेळायला पाहिजे होता. पण त्याने बॅकफुटवर जाऊन डिफेंड केलं. कोहली चेंडूची लाइन चुकला आणि बोल्ड झाला. कोहलीने त्या मॅचमध्ये फक्त 8 रन्स केल्या.

फ्रंट फुटवर चुकला

शनिवारी दोन्ही टीम्समध्ये रायपूर येथे सामना झाला. भारतासमोर विजयासाठी 109 धावांच सोपं लक्ष्य होतं. रोहित आणि गिलने 72 धावांची पार्ट्नरशिप करुन टीम इंडियाचा विजय पक्का केला. रोहित आऊट झाल्यानंतर कोहली बॅटिंगला आला, त्याने चौकार मारुन चांगली सुरुवात केली. टीमला तो विजयाच्या जवळ घेऊन गेला. टीमला विजयासाठी 7 धावांची गरज होती. तो पुन्हा एकदा सँटनरच्याच बॉलिंगवर आऊट झाला. यावेळी सँटनरे ऑफ स्टम्पच्या बाहेर कमालीचा चेंडू टाकला. हा फुल लेंथ चेंडू नव्हता. कोहलीने फ्रंट फुटवर येऊन ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण तो चुकला. लॅथमने कुठलीही चूक न करता, कोहलीच स्टम्पिंग केलं. लेफ्टी स्पिनर्स कोहलीसाठी एक कोडं

दोन सामन्यात एकाच गोलंदाजाने दोन वेगवेगळ्या पद्धतीने कोहलीला आऊट केलं. त्यातून लेफ्टी स्पिनर्ससमोर विराटची हतबलता अधोरेखित झालीय. फक्त या दोन मॅचच नाही, याआधी सुद्धा कोहली लेफ्टी स्पिनर्ससमोर हतबल ठरलाय. 2021 मध्ये 8 वनडे इनिंगमध्ये डावखुऱ्या स्पिनर्सचा सामना करताना कोहलीची सरासरी 12.5 आहे. स्ट्राइक रेट सुद्धा 69.4 आहे. चिंता करण्यासारखी बाब म्हणजे 8 इनिंगमध्ये कोहली 6 वेळा लेफ्टी स्पिनर्ससमोर आऊट झालाय. टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा हीच स्थिती आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.