IND vs NZ : न्यूझीलंडला अवघ्या 66 धावात गुंडाळलं, टीम इंडियाचा मालिका विजय

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यामध्ये 168 धावांनी विजय मिळवत 2-1 ने मालिका खिशात घातली आहे.

IND vs NZ : न्यूझीलंडला अवघ्या 66 धावात गुंडाळलं, टीम इंडियाचा मालिका विजय
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 11:15 PM

अहमदाबाद : भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यामध्ये (IND vs NZ 3rd T20) भारताने विजय मिळवला आहे. सलामीवीर शुभमन गिलच्या 126 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर किवींना 235 धावांचं लक्ष्य दिलं होतं. (India defeated the New Zealand team & win T20 Series latest marathi Sport News) मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या 68 धावांवर गारद झाला. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यामध्ये 168 धावांनी विजय मिळवत 2-1 ने मालिका खिशात घातली आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला 235 धावांंचं लक्ष्य दिलं होतं. भारताकडून युवा खेळाडू शुभमन गिलने सर्वाधिक 126 धावा करत शतक केलं. कमी वयात टी-20 मध्ये शतक मारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम माजी क्रिकेटपटू  सुरेश रैनाच्या नावावर होता. ईशान किशनला सोडलं तर प्रत्येक खेळाडूने मनसोक्त धुलाई केली होती.

शुभमन गिल 126, राहुल त्रिपाठी 44, सूर्यकुमार यादव 24, हार्दिक पांड्या 30  आणि  दीपक हुड्डा नाबाद 2 धावा यांच्या खेळीच्या जोरावर भारताने तब्बल 234 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेला न्यूझीलंडचा अर्धा संघ 21 धावांवर तंबूत परतला.

हार्दिक पांड्याने  खतरनाक फिन अॅलन आणि ग्लेन फिलिप्सला बाद केलं. सूर्यकुमार यादवने दोन्ही अफलातून झेल घेतले. दोन कॅचमुळे जवळपास किवींंचा संघ दबावामध्ये गेला. खराब सुरूवातीनंतर मिचेलला सोडता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने आपला शेवटचा T20 सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. यात भारताने विजय मिळवला होता. भारताने त्या मॅचमध्ये 224 धावा केल्या होत्या.

भारताकडून कप्तान हार्दिक पांड्याने चार, अर्शदीप सिंह दोन, उमरान मलिक दोन आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. भारताने या विजयासह 2-1 ने मालिका खिशात घातली आहे. वनडे मालिकेनंतर आता टी-20 मालिकाही टीम इंडियाने जिंकली आहे.  पाहुण्या संघाला भारत दौऱ्यात निराशा हाती आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.