मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला त्यामुळे पहिले सत्र खेळवता आले नाही त्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत 221 धावा केल्या होत्या. कालच्या 4 बाद 221 वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलने लोळवलं. काल मयंक अग्रवाल 120 धावांवर नाबाद होता त्याने आज 30 धावांचं योगदान दिलं. मयंक 150 धावांवर असताना एजाजचा बळी ठरला. आज अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी करत अखेरच्या षटकांमध्ये भारताला 300 पार नेलं. मात्र त्यालादेखील एजाजनेच पायचित केलं. (IND vs NZ, Mumbai Test: Ajaz Patel become Third Bowler in History to Claim 10 Wickets in an Innings)