What A Throw! इमाम उल हकला काही कळायच्या आतच अक्षर पटेलने त्याला पाठवलं तंबूत, पाहा Video
भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याचा रंग आता हळूहळू चढू लागला आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सावध सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानला दोन धक्के बसले. इमाम उल हकला तर त्याची चूक भोवली.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेत सावध सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये विकेट जाणार नाही याची काळजी घेतली. त्यात भारताचा आघाडीचा गोलंदाज दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने चिंता वाढली. त्यामुळे हार्दिक पांड्याला चेंडू सोपवावा लागला. हार्दिक पांड्याने आपली भूमिका चोखपणे बजावली आणि बाबर आझमला मैदानाबाहेर चालता केला. बाबर आझमची विकेट गेल्याने पाकिस्तानवर दबाव वाढला होता. इमाम उल हक सामना पुढे नेण्याचा प्रयत्नात होता. पण कुलदीप यादवचा सामना करताना चाचपडत होता. त्यामुळे स्ट्राईक बदलण्याच्या तयारी होता. पण त्याला ही चूक भोवली. दुसऱ्या चेंडूवर मिड ऑनच्या दिशेने फटका मारला आणि धावत सुटला.
अक्षर पटेल मिड ऑनवर भिंतीसारखा उभा होता. त्याच्या हातात चेंडू असताना धावणं म्हणजे मोठी चूकच.. पण इमामला ते काही कळलं नाही. अक्षर पटेलने नॉन स्ट्राईकच्या स्टंप अचूक हेरल्या आणि काही कळायच्या आता उडवल्या. इमामने उडी मारून क्रिजमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही. अक्षर पटेल ज्या वेगाने चेंडू स्टंप फेकला त्यातून विकेट वाचवणं कठीण होतं. जोरदार अपीलनंतर पंचांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. पण तत्पूर्वीच इमाम मैदान सोडून चालता झाला होता. स्क्रिनवर विकेट असल्याचं दिसलं आणि मैदानात भारतीय प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
WHAT A THROW BY AXAR PATEL 🤯 pic.twitter.com/JOBLfMKKWM
— Johns. (@CricCrazyJohns) February 23, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद
