AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs PAKW : वुमन्स टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी, पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा

India Women vs Pakistan Women Match Result : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने सांघिक कामगिरीच्या जोरावर विजयाने सुरुवात केली आहे. भारताने शेजारी पाकिस्तानवर 64 धावांनी मात केली आहे.

INDW vs PAKW : वुमन्स टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी, पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
Shree Charni Richa Ghosh Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 14, 2026 | 10:57 PM
Share

वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडिया स्पर्धेतील सहाव्या सामन्यात 14 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत 2 गुणांची कमाई केली आहे. टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 17 षटकांमध्ये 106 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह पाकिस्तानवर 64 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाचा वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा सातवा विजय ठरला आहे. तसेच टीम इंडियाने एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानला टी 20i क्रिकेटमध्ये पराभूत करण्याची ही चौथी वेळ ठरली.

पाकिस्तानचं पॅकअप

पाकिस्तानसाठी विजयी धावांचा पाठलाग करताना एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानसाठी ओपनर मुनीबा अली हीने सर्वाधिक धावा केल्या. मात्र दीप्ती शर्मा हीच्या अचूक थ्रोमुळे मुनीबाच्या खेळीचा शेवट झाला. दीप्ती मुनीबाला रन आऊट केलं. मुनीबाने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 41 धावा केल्या. मुनीबा व्यतिरिक्त टीम इंडियासमोर एकाही फलंदाजाला 20 हा आकडा गाठता आला नाही. आलिया रियाझ हीने 18 धावा केल्या. तर गुल फिरोझा आणि आयेशा झफर या दोघींनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. त्याशिवाय भारतीय गोलंदाजांसमोर एकीलाही दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही.

दीप्ती शर्माचा पाकिस्तानला पंच

टीम इंडियासाठी दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. श्री चरणी हीने तिघांना आऊट केलं. तर शफाली वर्मा हीने 1 विकेट घेत दोघींना चांगली साथ दिली. भारताने यासह विजयी सलामी दिली.

टीम इंडियाची विजयी सलामी

पहिल्या डावात काय झालं?

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियासाठी स्मृती मंधाना, कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष या तिघींनी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सर्वात मोठी आणि एकूण तिसरी धावसंख्या उभारता आली. स्मृती मंधाना हीने 68 तर हरमनप्रीतने 36 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी ऋचा घोष हीने 200 च्या स्ट्राईक रेटने 17 चेंडूत 34 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यामुळे भारताला 170 धावांपर्यंत पोहचता आलं. तर पाकिस्तानसाठी सादीया इक्बाल आणि फातिमा सना या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना