IND vs PAK: रोहितची जोरात सुरुवात, पहिल्याच बॉलवर भीमपराक्रम, मोठा रेकॉर्ड उध्वस्त
India vs Pakistan Rohit Sharma: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हिटमॅनने दिग्गज माजी फलंदाजाचा रेकॉर्ड उध्वस्त केला आहे.

सलग 2 वेळा पावसाने खोडा घातल्यानंतर विलंबाने का होईना, अखेर बहुप्रतिक्षित टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याला सुरुवात झाली. पाकिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन बाबर आझम याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात आली. तर पाकिस्तानकडून शाहीन शाह अफ्रिदी बॉलिंगसाठी आला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.
रोहित पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर गेला तर विराट नॉन स्ट्राईक एंडवर. रोहितने शाहिनने टाकलेल्या पहिल्याच बॉलवर 2 धावा घेतल्या. रोहितने यासह विक्रमाला गवसणी घातली. रोहित या 2 धावांसह आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत श्रीलंकेचा माजी दिग्गज महेला जयवर्धने याला मागे टाकलं. रोहितला या सामन्याआधी महेलाचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 2 धावांची गरज होती. रोहितने पहिल्याच बॉलवर 2 धावा घेत हा विक्रम आपल्या नावावर केला.
रोहितने त्यानंतर शाहिनच्या ओव्हरमध्ये सिक्स ठोकला. टीम इंडियाने पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा केल्या. रोहित शर्माने या सिक्ससह आणखी एक अनोखा विक्रम केला. रोहित शाहिन अफ्रिदीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. रोहितने अशाप्रकारे एकाच ओव्हरमध्ये 8 धावांसह टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन देत 2 खास विक्रम आपल्या नावावर केले.
टी 20 वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक धावा
विराट कोहली : 1 हजार 142 धावा रोहित शर्मा : 1 हजार 17* धावा महेला जयवर्धने : 1 हजार 16 धावा
रोहितचा पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स
THE GREATEST SIX HITTER EVER – Hitman Rohit Sharma. 🔥🇮🇳 pic.twitter.com/wHQbq6TVTL
— Johns. (@CricCrazyJohns) June 9, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
