IND vs SA : कॅप्टन शुबमन गिल रुग्णालयात दाखल, दुसऱ्या कसोटीला मुकणार! टीम इंडिया अडचणीत

Shubman Gill Hospitalized : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना काही दिवसांपूर्वी भारताचा एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला दुखापतमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता कसोटी संघाचा कर्णधार याला शुबमन गिल याला रुग्णालया दाखल केलं गेलं आहे.

IND vs SA : कॅप्टन शुबमन गिल रुग्णालयात दाखल, दुसऱ्या कसोटीला मुकणार! टीम इंडिया अडचणीत
Team India Captain Shubman Gill Neck Injury
Image Credit source: PTI
Updated on: Nov 15, 2025 | 9:43 PM

भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी 16 नोव्हेंबरला लागणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या 30 धावांच्या प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 93 रन्स केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे 63 धावांची आघाडी आहे. त्यामुळे भारताकडे दक्षिण आफ्रिकेला रविवारी झटपट गुंडाळून 2 अंकी आव्हान मिळवून सामना जिंकण्याची संधी आहे. अशात आता टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. कॅप्टन शुबमन गिल याला दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शुबमनला नक्की काय झालं?

शुबमनला शनिवारी 15 नोव्हेंबरला पहिल्या डावात बॅटिंग करताना मानेला त्रास जाणवला. हा त्रास जास्त वाढला. त्यामुळे शुबमनला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर आता शुबमनला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे शुबमन या संपूर्ण मालिकेतूनच बाहेर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना हा कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये खेळवण्यात येत आहे. शुबमन गिल याला सामन्यातील दुसऱ्या दिवशी बॅटिंग करताना मानेत त्रास जाणवला. शुबमनने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज सायमन हार्मर याच्या बॉलिंगवर स्लॉग स्वीप मारण्याच प्रयत्न केला. या प्रयत्नात शुबमनच्या मानेला त्रास झाला. त्यामुळे शुबनला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं.

शुबमन चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. शुबमन फक्त 3 बॉल खेळला. त्यानंतर शुबमनला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. शुबमनने 4 धावा केल्या. शुबमनने हार्मरला बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरुन फोर लगावला. मात्र या दरम्यान शुबमनला हा त्रास झाला. शुबमनला त्रास झाल्याचं समजताच फिजिओ धावत मैदानात आले. परिस्थिती पाहता फिजिओने शुबमनला मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय केला. त्यामुळे शुबमनला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. भारताच्या डावातील 35 व्या ओव्हरदरम्यान हा प्रकार घडला.

शुबमन संपूर्ण मालिकेला मुकणार

फिजिओने शुबमनला मानेला कॉलरने झाकून मैदानाबाहेर नेलं. त्यामुळे शुबमनला झालेली दुखापत गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. मात्र अद्याप बीसीसीआयकडून शुबमन गिल याच्या दुखापतीबाबत पुढील काही अपडेट देण्यात आलेली नाही.