AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Sa 2nd T20 : दुसऱ्या T-20 सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचं वादळ सुसाट, भारताचा पुन्हा दारूण पराभव

भारतीय संघाच्या अडचणी वाढतच गेल्या आणि पुन्हा एकदा भारताना कमी धावांवर समाधान मानवे लागले. त्यामुळे या सामन्यचा निकला आधीच काहीसा दिसून आला. भारताने दिलेलं आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केले. 

Ind Vs Sa 2nd T20 : दुसऱ्या T-20 सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचं वादळ सुसाट, भारताचा पुन्हा दारूण पराभव
भारताचा सलग दुसरा पराभवImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 12, 2022 | 10:29 PM
Share

कटक : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind Vs Sa) यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-20 सामनाही (2nd T20) साऊथ आफ्रिकेने जिंकला आहे. हा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला (Indian Cricket Team) प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि  भारतीय संघाने सुरूवात करत 20 षटकात 6 विकेट देत 148 धावा ठोकल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 149 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले होते, यावेळी  टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 40 धावा ठोकल्या तर त्याने 35 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार सामील होती. तसेच इशान किशनने 21 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 34 धावांची शानदार खेळी केल्याचेही दिसून आले. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढतच गेल्या आणि पुन्हा एकदा भारताना कमी धावांवर समाधान मानवे लागले. त्यामुळे या सामन्यचा निकला आधीच काहीसा दिसून आला. भारताने दिलेलं आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केले.

आफ्रिकेचा दणदणीत विजय

हेनरिक क्लासेन शानदार अर्धशतक

हेनरिक क्लासेनने आपल्या कारकिर्दीतील चौथे टी-20 अर्धशतक 32 चेंडूत पूर्ण केले. त्याने हार्दिक पंड्याच्या षटकातीलतिसऱ्या चेंडूवर 50 आपलं अर्धशतक पूर्ण करत इशादे स्पष्ट केले. त्यानंतर लगेज त्याने लाँग ऑनवर शानदार षटकार ठोकला. त्यामुळे त्याचं हे अर्धशक आफ्रिकेसाठी संकटमोचक ठरलं आहे.

भुवनेश्वरची जबरदस्त गोलंदाजी

भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक गोलंदाजी करत साऊथ आफ्रिकेला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय संघाला हे आव्हान पेललं नाही. सुरूवातीला अडचणीत असणाऱ्या आफ्रिकेने नंतर तडाखेबाज फलंबादाजी करत सामना खिशात घातला. भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात भारताला विकेट मिळवून ते ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने रीझा हेड्रिक्सला बोल्ड केले. तसेच दुसऱ्याच षटकात दुसरा जोरदार झटका दिला. भुवीने ड्वेन प्रिटोरियसला आवेश खानच्या हाती कॅच आऊट करत माघारी धाडले. भुवनेश्वर कुमारने त्याच्या तिसऱ्या ओव्हमध्येही हीच घोडदौड कायम ठेवत तिसऱ्या चेंडूवर रसी व्हॅन डर डुसेनला पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यामुळे सुरूवातील सामना रंगत होताना दिसला. मात्र नंतर भारताचा डाव गडगडता आता भारताला मालिका जिंकण्यासाठी उरलेले सर्व समाने जिंकण्याचं आव्हान असणार आहे.

भुवनेश्वर कुमार पुन्हा चमकला

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.