IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन सूर्यकुमार शुबमनबाबत म्हणाला….

India vs South Africa 2nd T20i Post Match : दुसऱ्या टी 20i सामन्यात भारतीय संघाने क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. तिलक वर्मा आणि मोजक्यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेसमोर गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह पहिल्या पराभवाची परतफेड केली आणि मालिकेत विजयाचं खातं उघडलं. भारताच्या या पराभवाबाबत कर्णधार सूर्यकुमार यादव याने काय म्हटलं? जाणून घ्या.

IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन सूर्यकुमार शुबमनबाबत म्हणाला....
Suryakumar Yadav Post Match IND vs SA 2nd T20i
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 12, 2025 | 12:58 AM

टीम इंडियाला गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 51 धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताचं 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर पॅकअप केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. न्यू चंदीडगमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने हा लाजिरवाणा पराभव असल्याचं म्हटलं. तसेच सूर्याने पराभवाचं कारणही सांगितलं. सोबतच सूर्याने उपकर्णधार शुबमन गिल याच्या निराशाजनक कामगिरीबाबतही भाष्य केलं.

सूर्यकुमारने कारण काय सांगितलं?

“आम्ही पहिले बॉलिंग केली. आम्ही फार काही करु शकत नव्हतो. आम्हाला फक्त चांगलं कमबॅक करता आलं असतं कारण आम्ही पहिले बॉलिंग केली. त्यामुळे त्यांना (दक्षिण आफ्रिकेला) कशी बॉलिंग करायची हे समजलं. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. शिका आणि पुढे चालत रहा”, असा आशावाद सूर्याने व्यक्त केला.

“त्यांनी कशी बॉलिंग केली यातून आम्ही धडा घेतला. आम्ही त्यातून शिकलो. त्यातून आता पुढील सामन्यात तसं करण्याचा प्रयत्न करु”, असं सूर्याने नमूद केल.

अक्षर पटेलबाबत सूर्याची प्रतिक्रिया

शुबमन गिल याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. शुबमनला भोपळाही फोडता आला नाही. शुबमननंतर अक्षर पटेल तिसऱ्या स्थानी आला. अक्षरला तिसऱ्या स्थानी पाठवल्याने चाहत्यांकडून या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. सूर्याने याबाबतही सांगितलं.

“अक्षरला पुढे बॅटिंगला पाठवण्याबाबत आम्ही गेल्या सामन्यात विचार केला होता. आम्ही अक्षरला मोठ्या फॉर्मेटमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहिलंय. अक्षरकडून आजही तशाच प्रकारे बॅटिंग अपेक्षित होती. मात्र अक्षरला तसं करता आलं नाही”, असं सूर्याने स्पष्टीकरण दिलं.

सूर्याची शुबमनच्या फ्लॉप कामगिरीबाबत प्रतिक्रिया

सूर्याने उपकर्णधार शुबमन गिल याच्या सातत्यपूर्ण आणि निराशाजनक कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली. “मला आणि शुबमनला चांगली सुरुवात करुन द्यायला हवी होती. कारण दर वेळेस अभिषेक शर्मा याच्यावर विसंबून राहणं योग्य नाही. अभिषेक ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्यानुसार तो ही अपयशी ठरु शकतो. मला, शुबमनला आणि इतर काही फलंदाजांना डाव सावरायला पाहिजे होता”, असं म्हणत सूर्याने बॅटिंगमध्ये टीम म्हणून कमी पडल्याचं मान्य केलं.