
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने मंगळवारी 9 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर उभयसंघातील दुसरा सामना हा न्यू चंडीगड इथील मुल्लानपूरमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकल्यानंतर प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेतला. कॅप्टन सूर्याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम मॅनेजमेंटने त्याच प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 फलंदाज, 2 बॅटिंग ऑलराउंडर, 1 विकेटकीपर, 1 स्पिन बॉलिंग ऑलराउंडर, 1 स्पेशालिस्ट स्पिनर आणि 2 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. एनरिक नॉर्खिया, केशव महाराज आणि ट्रिस्टन स्टब्स या तिघांना विश्रांती दिली आहे. तर या तिघांच्या जागी अनुक्रमे ओटनील बार्टमॅन, जॉर्ज लिंडे आणि रीजा हेंड्रिक्स यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेला मालिकेत 1-1 ने बरोबरी करायची असेल तर कोणत्याही स्थितीत हा दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. तर टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेतील आघाडी आणखी मजबूत करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे दुसरा सामना कोणता संघ जिंकणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा(विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्रक्रम(कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, लुंगी एन्गिडी आणि ओटनील बार्टमन.