AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 3rd Test Cape Town Weather: केपटाऊनमध्येही पाऊस खलनायक बनणार? जाणून घ्या वेदर रिपोर्ट

जोहान्सबर्ग कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केपटाऊन हवामान कसे असले? त्याची चर्चा सुरु आहे. 

IND vs SA 3rd Test Cape Town Weather: केपटाऊनमध्येही पाऊस खलनायक बनणार? जाणून घ्या वेदर रिपोर्ट
Photo from Social Media
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 1:05 PM
Share

केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना उद्या केपटाऊनच्या न्यूलँडस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताने पहिली सेंच्युरियन कसोटी जिंकली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गची कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेतील तिसऱ्या निर्णायक कसोटीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण केपटाऊनचा जय-पराजय मालिकेचा निकाल निश्चित करणार आहे. मागच्या दोन कसोटींप्रमाणे या कसोटीवरही पावसाचे सावट आहे. (IND vs SA 3rd Test Cape Town Will rain spoil the game know about Weather report)

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्यादिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवले होते, तर जोहान्सबर्ग कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केपटाऊन हवामान कसे असले? त्याची चर्चा सुरु आहे. हवामानाशी संबंधित अपडेट देणाऱ्या एक्यूवेदर.कॉमनुसार केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी ढगाळ हवामान असेल. पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पहिल्या सत्राचा खेळ म्हणजे लंच आधीचा खेळ पावसामुळे वाया जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर आकाश स्वच्छ असेल.

सामन्याचे पाचही दिवस वातावरण कसे असेल? केपटाऊन कसोटीच्या पहिल्यादिवशी 11जानेवारीला पावसाची शक्यता 64 टक्के आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यादिवशी पावसाची शक्यता अजिबात नाही. चौथ्यादिवशी 14 जानेवारीला पावसाची शक्यता फक्त एक टक्के आहे. पाचव्यादिवशी 15 जानेवारीला पाऊस कोसळण्याची शक्यता 19 टक्के आहे. त्यामुळे पहिला दिवस सोडल्यास नंतरचे चार दिवस आकाश निरभ्र राहील.

संबंधित बातम्या:

IND vs SA: टीम इंडियाच्या प्लेइंग XI बद्दल महत्त्वाची अपडेट, केपटाऊन टेस्टमध्ये हे दोन मोठे बदल होऊ शकतात IND vs SA: संघाबाहेर कोण जाणार? कॅप्टन कोहलीसाठी मुंबईकर खेळाडूचा बळी देणार? Rishabh Pant: ‘खेळाडू मोठा असो वा छोटा, चूक ही चूकच असते’, ऋषभ पंतला पुन्हा सुनावलं

(IND vs SA 3rd Test Cape Town Will rain spoil the game know about Weather report)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?