AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Final Live Streaming : वर्ल्ड कप फायनलसाठी टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका तयार, किती वाजता सुरुवात होणार?

India vs South Africa Womens World Cup 2025 Live Match Score : टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीपासून 1 पाऊल दूर आहे. वर्ल्ड कप आणि टीम इंडियात दक्षिण आफ्रिका उभी आहे. भारताला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं असेल तर दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावं लागणार आहे.

IND vs SA Final Live Streaming : वर्ल्ड कप फायनलसाठी टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका तयार, किती वाजता सुरुवात होणार?
India vs South Africa Womens Final Live StreamingImage Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 01, 2025 | 4:06 PM
Share

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी यजमान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. भारताने 29 ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील सामन्यात 5 विकेट्सन धुव्वा उडवला. तर त्याआधी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभवाची धुळ चारत फायनलमध्ये धडक दिली. दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे या संघामध्ये अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. हा अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. हरमनप्रीत कॅप्टन म्हणून पहिल्याच वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला फायनलमध्ये पोहचवण्यात यशस्वी ठरली. तर लॉरा वोल्वार्ड्ट दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहचवणारी पहिली कर्णधार ठरलीय. त्यामुळे लॉरा आणखी एक विजय मिळवून देणार का? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना रविवारी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

महिला ब्रिगेड अनेक दशकांची प्रतिक्षा संपवणार?

दरम्यान भारतीय महिला संघाला आतापर्यंत वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. मात्र आता भारताकडे सुवर्णसंधी आहे. त्यामुळे भारतीय संघ मायदेशात होणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवून भारतीय चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?