IND vs SA जे काम धोनी कोहलीला जमलं नाही, ते काम रिषभ पंत करेल का ?

आत्ता झालेल्या सुरूवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. सांघिक खेळ उत्तम न झाल्याने पराभव झाला होता असं मॅच पाहताना दिसलं. त्यानंतर राहिलेले दोन भारतीय संघाने चांगली कामगिरी केल्याने जिंकले.

IND vs SA जे काम धोनी कोहलीला जमलं नाही, ते काम रिषभ पंत करेल का ?
दोन सामने जिंकल्याने उत्सुकता वाढली
Image Credit source: twitter
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 19, 2022 | 8:35 AM

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) आत्तापर्यंत अनेक चांगले खेळाळू मिळाले. त्याचबरोबर चांगले कर्णधार देखील मिळाले आहेत. प्रत्येक खेळाडूने संघासाठी चांगले आणि योग्य योगदान दिले आहे. सगळ्यात यशस्वी ठरला तो महेंद्र सिंग धोनी (Mahendra Sing Dhoni) त्याने त्यांच्या कारकिर्दीत सगळ्यात जास्त विजय नोंदविले. त्याचबरोबर टी20 विश्व चषकासह एकदिवशीय विश्व चषक देखील जिंकल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्यामुळे सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडं पाहिलं जात. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने सुद्धा त्यांच्या कर्णधार काळात चांगली कामगिरी केली. त्याने क्रिकेटच्या सगळ्याचं फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु तो अजूनही संघातून क्रिकेट खेळत आहे. सध्या भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी बरोबरी साधली आहे. उर्वरीत एक सामना जिंकेल त्याचा तो चषक मिळणार आहे. सलग दोन सामने जिंकल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. रिषभ पंत हा सध्या टी20 संघाचा कर्णधार असून बंगलोरमध्ये होणाऱ्या सामन्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

दोन्ही सामने जिंकल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला

आत्ता झालेल्या सुरूवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. सांघिक खेळ उत्तम न झाल्याने पराभव झाला होता असं मॅच पाहताना दिसलं. त्यानंतर राहिलेले दोन भारतीय संघाने चांगली कामगिरी केल्याने जिंकले. दक्षिण अफ्रिकेविरूद्ध आत्तापर्यंत भारतीय संघाने भारतात टी20 मालिका अद्याप जिंकलेली नाही. शेवटचा सामना जिंकल्यानंतर ही मालिका भारताच्या खिशात पडणार आहे. त्याचबरोबर त्या विजयाचा शिल्पकार म्हणून रिषभ पंतचा गौरव होणार आहे.

धोनीला सुध्दा हार मिळाली होती

महेंद्र धोनीला सुध्दा टी20 मालिकेमध्ये 2015 मध्ये हार मिळाली होती. त्यावेळी देखील सांघिक कामगिरी खराब झाल्यामुळे पराभव झाला होता. 2-0 अश्या फरकाने भारताचा पराभव झाला होता.

हे सुद्धा वाचा

विराट कोहली सुध्दा कॅप्टन म्हणून अपयशी ठरला होता

दक्षिण अफ्रिकेचा संघ ज्यावेळी भारतीय दौऱ्यावर आला होता. त्यावेळी 2019 ला पहिल्या सामन्यात पाऊस पडला, त्यानंतर ती मॅच रद्द झाली होती. दुसऱ्या मॅचमध्ये सात विकेटने भारताचा पराभव झाला होता. तसेच तिसरी मॅच सांघिक कामगिरी अयोग्य झाल्याने हार मिळाली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें