IND vs SA: दक्षिण आफ्रिका आक्रमणासाठी सज्ज, ‘या’ चार गोलंदाजांपासून टीम इंडियाला सावध रहाण्याची गरज

IND vs SA T20 Series: दोन महिने चाललेल्या IPL सीजननंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आता आंतरराष्ट्रीय सीजनसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियासमोर पहिलं आव्हान दक्षिण आफ्रिकेच आहे.

IND vs SA: दक्षिण आफ्रिका आक्रमणासाठी सज्ज, 'या' चार गोलंदाजांपासून टीम इंडियाला सावध रहाण्याची गरज
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 03, 2022 | 5:41 PM

IND vs SA T20 Series: दोन महिने चाललेल्या IPL सीजननंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आता आंतरराष्ट्रीय सीजनसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियासमोर पहिलं आव्हान दक्षिण आफ्रिकेच आहे. दक्षिण आफ्रिकेचा मजबूत संघ भारतात आला (South Africa India Tour) आहे. त्यांची फलंदाजी मजबूत आहेच. पण टीम इंडियासमोर खरं आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचं असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीत वैविध्य आहे. त्यांचे चार गोलंदाज भारताची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढवू शकतात. भारताला ही मालिका जिंकायची असेल, तर त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा हुशारीने सामना करावा लागेल.

  1. कगिसो रबाडा: हा दक्षिण आफ्रिकेच्या उत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये तो प्रभावी ठरतो. आयपीएल 2022 मध्ये विकेट घेण्याबरोबरच धावा रोखण्यातही तो यशस्वी ठरला होता. आयपीएल मध्ये त्याने 23 विकेट घेतले. तो आतापर्यंत 40 सामने खेळला आहे. भारताविरुद्ध रबाडा आतापर्यंत 4 टी 20 सामने खेळला असून त्याने 4 विकेट घेतल्या आहेत.
  2. तबरेज शम्सी: टी 20 क्रिकेटमधला हा नंबर एक गोलंदाज आहे. प्रत्येक फलंदाजासाठी तो धोकादायक आहे. हा फिरकी गोलंदाज फलंदाजांच्या अडचणी वाढवतोय. भले, तो आयपीएलमध्ये खेळला नसेल, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा जलवा कायम आहे. 47 टी 20 सामन्यात त्याच्या नावावर 57 विकेट्स आहेत. धावा रोखण्याचीही त्याची क्षमता आहे. तो फक्त 6.74 च्या सरासरीने धावा देतो. यावर्षाच्या सुरुवातीला वनडे सीरीमध्ये त्याचा सामना करताना भारतीय फलंदाजांना अडचणी आल्या होत्या.
  3. केशव महाराज: शम्सी प्रमाणे केशव महाराज ऑफ स्पिनर आहे. आफ्रिकेच्या या अनुभवी फिरकी गोलंदाजाने मागच्यावर्षी टी 20 मध्ये डेब्यू केला होता. आतापर्यंत त्याने 8 सामन्यात 6 विकेट घेतल्यात. धावा देण्याच्या बाबतीत मात्र तो कंजूष आहे. त्याने 5.82 च्या सरासरीने धावा दिल्यात. वनडे सीरीजमध्ये त्याने भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या.
  4. एनरिक नॉर्खिया: या यादीत एनरिक नॉर्खिया चौथ्या स्थानावर आहे. आफ्रिकेचा हा गोलंदाज वेगाबरोबर चेंडूही स्विंग करु शकतो. बाऊन्सरचाही तो चांगला उपयोग करतो. अलीकडे तो फिटनेसच्या समस्येमुळे त्रस्त होता. IPL 2022 मध्ये तो महागडा गोलंदाज ठरला. पण दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना त्याची कामगिरी नेहमी उजवी असते. 16 सामन्यात त्याने 18 विकेट घेतल्यात. 6.75 फक्त त्याचा इकोनॉमी रेट आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें