
टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाने या मालिकेसाठी कंबर कसली आहे. दोन्ही संघांसाठी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर ही मालिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी या मालिकेचं फार महत्त्व आहे. उभयसंघात या मालिकेतील पहिला सामना हा कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना मंगळवारी 9 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? तसेच खेळपट्टीतून कुणाला मदत मिळेल? हे सविस्तर जाणून घेऊयात.
कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये साडे 3 वर्षांनंतर टी 20i सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मैदानात अखेरीस जून 2022 साली अखेरचा टी 20i सामना खेळवण्यात आला होता. तसेच या मैदानात गेल्या सामन्यात जेव्हा भारत-दक्षिण आफ्रिका संघ भिडले होते तेव्हा गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला होता. या खेळीपट्टीवर खेळणं फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. तर त्यानंतर फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या दोघांचं ओपनिंग करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. जितेश शर्मा याला विकेटकीपर आणि बॅट्समन म्हणून संधी दिली जाऊ शकते. ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं कमबॅक निश्चित म्हटलं जात आहे. हार्दिकच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाच्या बॅटिंग आणि बॉलिंगची ताकद वाढेल. हार्दिकला आशिया कप 2025 स्पर्धेत दुखापर झाली होती. हार्दिक तेव्हापासून टीम इंडियातून बाहेर होता.
अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांवर फिरकीची जबाबदारी असेल. वरुण चक्रवर्ती यालाही संधी मिळू शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या दोघांचा समावेश केला जाऊ शकतो.
पहिल्या टी 20i साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.