IND vs SL : 48 तासात व्हिलनचा हिरो झाला टीम इंडियाचा हा खेळाडू

संजय पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 07, 2023 | 11:52 PM

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 91 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

IND vs SL : 48 तासात व्हिलनचा हिरो झाला टीम इंडियाचा हा खेळाडू

Arshdeep Singh : क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल जोवर टाकला जात नाही, तोवर काहीही निश्चित मानता येत नाही. एका बॉलमध्ये पूर्ण सामना फिरतो. त्या हिशोबानेच एखादा खेळाडूल हा व्हिलनचा हिरो होतो किंवा हिरो ते झिरोसुद्धा होतो. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा (Indian Cricket Team) बॉलर व्हिलन ठरला होता. मात्र श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या आणि सीरिज डिसायजर सामन्यात हा गोलंदाज हिरो ठरलाय. (ind vs sl 3rd t20i team india arshdeep singh get 3 wickets against sri lanka at rajkot and shines)

अर्शदीप सिंहने हिरोसारखी कामगिरी केली. सूर्यकुमार यादवने पहिले बॅटिंग करताना शानदार शतकी खेळी केली. अर्शदीपने या शतकी खेळीवर आपल्या बॉलिंगने 3 विकेट्स घेत शान वाढवली. अर्शदीपने दुसऱ्या सामन्यात सलग 3 बॉल टाकले. अर्शदीपची ती ओव्हर निर्णायक ठरली. दुसऱ्या सामन्यातील पराभवाला अर्शदीपला कारणीभूत ठरवलं जात होत. त्याच्यावर चौफेर टीका केली गेली.

मात्र अर्शदीप खचला नाही. अर्शदीपने तोंडाने उत्तर न देता आपल्या बॉलिंगची धारने श्रीलंकेच्या 3 फलंदाजांचा काटा काढला. अर्शदीपने एकूण 3 विकेट्स घेतल्या. अर्शदीप टीम इंडियाकडून तिसऱ्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

हे सुद्धा वाचा

तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 91 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 16.4 ओव्हरमध्ये 137 धावांवर गुंडाळलं.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, अविष्का फर्नांडो, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI