AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 1st ODI: शामराह ब्रुक्सची कॅच घेतल्यानंतर श्रेयस अय्यर चक्क मैदानात नाचला, पहा VIDEO

IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये काल पहिला वनडे सामना (First odi) झाला. भारताने या रोमहर्षक सामन्यात अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. या मॅच मध्ये 97 धावांची खेळी करणारा शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

IND vs WI 1st ODI:  शामराह ब्रुक्सची कॅच घेतल्यानंतर श्रेयस अय्यर चक्क मैदानात नाचला, पहा VIDEO
shreyas iyerImage Credit source: twitter
| Updated on: Jul 23, 2022 | 11:52 AM
Share

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये काल पहिला वनडे सामना (First odi) झाला. भारताने या रोमहर्षक सामन्यात अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. या मॅच मध्ये 97 धावांची खेळी करणारा शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. शिखर धवनसह (Shikhar dhawan) टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने दमदार फलंदाजी केली. शिखर धवनसोबत सलामीला आलेल्या शुभमन गिलने (64) आणि श्रेयस अय्यरने (54) धावा फटकावल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना 307/8 धावा केल्या. भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची खराब सुरुवात झाली. वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शाई होप लवकर बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला आऊट केलं. सिराजच्या पाचव्या षटकात शाई होपने (7) धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर कायली मेयर्सने शामराह ब्रुकसच्या साथीने डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली.

पुलच्या शॉटच्या मोहात पाडलं

वेस्ट इंडिजच्या डावात 24 व्या षटकात शामराह ब्रुक्स अर्धशतकाच्या जवळ होता. मेयर्सने त्याआधी अर्धशतक फटकावलं होतं. शार्दुल ठाकूरने ब्रुक्सला पुलच्या शॉटच्या मोहात पाडलं. ब्रुक्सला ठाकूरच्या गोलंदाजीवर फटका व्यवस्थित खेळता आला नाही. व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. श्रेयस अय्यरने डीप स्क्वेयर लेगला त्याचा झेल घेतला. ब्रुक्सने 61 चेंडूत 46 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार आहे.

मैदानावरच डान्स केला

ब्रुक्सचा झेल घेतल्यानंतर श्रेयस अय्यरने खास स्टाइलने सेलिब्रेश केलं. त्याने मैदानावरच डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सिराजची जबरदस्त गोलंदाजी

टीम इंडियाच्या या विजयाचा खरा हिरो मोहम्मद सिराज आहे. सिराजच्या अवघ्या 2 षटकांनी सामना भारताच्या बाजूने फिरवला. त्याने 10 षटकात 57 धावा देऊन 2 विकेट काढल्या. सिराजने त्याच्या कोट्यातील शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. कॅरेबियाई फलंदाजांना त्याने चांगलच हैराण केलं. त्याच्या शानदार कामगिरीच्या बळावर शेवटच्या चेंडू पर्यंत चाललेल्या या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 3 धावांनी विजय मिळवला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.