AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies, 2nd ODI Preview: वेस्ट इंडिज पलटवार करणार की भारत मालिका जिंकणार? आज फैसला

आज भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) खेळवला जाणार आहे. पण, वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल. वास्तविक 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे.

India vs West Indies, 2nd ODI Preview: वेस्ट इंडिज पलटवार करणार की भारत मालिका जिंकणार? आज फैसला
Rohit Sharma- Kieron Pollard
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 10:57 AM
Share

मुंबई : आज भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) खेळवला जाणार आहे. पण, वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल. वास्तविक 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवलेला पहिला एकदिवसीय सामना भारताने 6 गडी राखून जिंकला होता. अशा परिस्थितीत आता त्याच मैदानावर खेळवली जाणारी दुसरी वनडेही भारताने जिंकली, तर मालिकेवर टीम इंडियाचाच ताबा असेल. मात्र, वेस्ट इंडिज संघाला ते अजिबात परवडणार नाही. त्यामुळे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आज पलटवार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजची फलंदाजी डळमळीत झाली होती. अष्टपैलू जेसन होल्डर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा सामना केला नाही. पाहुण्या संघाला दुसऱ्या वनडेत मागील चुकीची पुनरावृत्ती टाळायची आहे. त्याचवेळी, सिरीज जिंकण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात कॅरेबियन्सचा पराभव करायचा आहे.

वेस्ट इंडिज पलटवार करणार की भारत मालिका जिंकणार?

मोटेराच्या मैदानावर उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांवर नजर टाकली तर वेस्ट इंडिजचे पारडे जड दिसते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मोटेरा येथे सातवा एकदिवसीय सामना होणार आहे. पण याआधी झालेल्या 6 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने 4, तर भारताने फक्त 2 सामने जिंकले आहेत. उभय संघांची अलीकडची कामगिरी पाहता भारताचं पारडं जड आहे. कारण दोन्ही संघांमधील मागील 5 एकदिवसीय सामन्यांपैकी 4 सामने भारताने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजला फक्त 1 सामना जिंकता आला आहे.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय भूमीवर आज भारत आणि वेस्ट इंडिज 60 व्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. याआधी खेळलेल्या दोन्ही संघांमधील एकूण 59 एकदिवसीय सामन्यांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. कारण 59 पैकी 30 सामने भारताने जिंकले आहेत तर वेस्ट इंडिजने 28 सामने जिंकले आहेत. तर एक सामना टाय झाला आहे.

2022 मधल्या पहिल्या मालिका विजयाची संधी

आजच्या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनच्या टॉप ऑर्डरमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. मात्र वेस्ट इंडिज संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. भारताने या वर्षात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही मालिका जिंकलेली नाही. त्यांच्याकडे वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात संधीचे सोने करणे तितकेसे सोपे नसेल.

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.