AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : दुसऱ्या कसोटीत प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या मुलीचा संताप, मुलाला कानफटवलं Video

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. असं असताना या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. मुलीने संतापून मुलाला कानशिलात लगावली.

IND vs WI : दुसऱ्या कसोटीत प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या मुलीचा संताप, मुलाला कानफटवलं Video
IND vs WI : दुसऱ्या कसोटीत प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या मुलीचा संताप, मुलाला कानफटवलं VideoImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Oct 13, 2025 | 6:31 PM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. भारताने दुसऱ्या कसोटीवरही पकड मिळवली आहे. या सामन्याचा शेवटचा दिवस शिल्लक असून भारताच्या हाती 9 विकेट असून विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा सामना भारत जिंकेल असा तमाम क्रीडाप्रेमींना विश्वास आहे. असं असताना या सामन्याच्या चौथ्या दिवशी एक विचित्र प्रकार मैदानात घडला. हा सामना पाहण्यासाठी एक मुलगा आणि मुलगी आले होते. कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या दृश्यानुसार ते मित्र असावेत असा वाटतं. दोघं कॅमेऱ्यात कैद झाले तेव्हा वेस्ट इंडिज मजबूत स्थितीत होता. वेस्ट इंडिजने 4 बाज 293 धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटत होतं. क्रिकेटप्रेमींना चिंतेत टाकणारी स्थिती होती. असं असताना कॅमेरा फिरला आणि एक दृष्य त्यात चित्रित झालं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोघेही सामना पाहात होते. अचानक मुलीने मुलाच्या कानशिलात मारली. असं तिने एकदा नाही दोनदा तीनदा केले.सुरुवातीला काही तरी गंभीर झालं आहे असं वाटलं. रागाच्या भरात मुलीने त्याला मारलं असं वाटलं. पण दोघेही हसताना दिसेल. इतकंच काय तर तिने मस्करीत गळा दाबला. हे दृष्य चित्रित झाल्यानंतर कॅमेरा फिरला आणि पुन्हा सामना सुरु झाला. पण दोघांचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरला आहे. तसेच या दृश्याची चर्चा होत आहे. विकेट पडत नसल्याने मुलीचा संताप झाला असावं असं काही जणांचं सोशल मीडियावर म्हणणं आहे.

कॅमेरा फिरताच कुलदीप यादवने कमाल केली. 293 धावांवर वेस्ट इंडिजला पाचवा धक्का बसला. कुलदीप यादवने यष्टीरक्षक टेविन इमलाचची विकेट काढली. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर रोस्टन चेसची विकेट काढली. खॅरी पियरेलाही जास्त काळ तग धरू दिलं नाही आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडिजने 311 धावांवर 9 विकेट गमावल्या. पण दहाव्या विकेटने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. त्यांनी 79 धावांची विक्रमी भागीदारी केली आणि संघाला 390 धावांपर्यंत पोहोचवलं. दहावी विकेट पडली आणि भारताला 121 धावांचं आव्हान मिळालं. भारताला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे.

दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.