AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM 1st odi: राष्ट्रगीत सुरु असताना इशान किशनवर मधमाशीचा हल्ला, पहा VIDEO

IND vs ZIM 1st odi: भारताकडे आता 1-0 आघाडी आहे. सामना सुरु होण्याआधी असं काही घडलं की, इशान किशन (Ishan Kishan) चर्चेचा विषय बनलाय.

IND vs ZIM 1st odi: राष्ट्रगीत सुरु असताना इशान किशनवर मधमाशीचा हल्ला, पहा VIDEO
ishan kishan Image Credit source: BCCI
| Updated on: Aug 19, 2022 | 12:03 PM
Share

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. काल गुरुवारी पहिला वनडे (1st odi) सामना झाला. या मॅच मध्ये भारताने झिम्बाब्वेवर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. भारताकडे आता 1-0 आघाडी आहे. सामना सुरु होण्याआधी असं काही घडलं की, इशान किशन (Ishan Kishan) चर्चेचा विषय बनलाय. सामना सुरु होण्याआधी दोन्ही देशांच राष्ट्रगीत वाजवलं जातं. काल हरारेच्या स्टेडियम मध्ये भारताच राष्ट्रगीत सुरु असताना, इशान किशनवर एका मधमाशीने हल्ला केला. इशानने लगेच हालचाल केली व तो हल्ला परतवून लावला.

इशानने स्वत:ला वाचवलं

दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी उभे होते. त्यावेळी एका मधमाशीमुळे इशान किशन अडचणीत आला. भारताच राष्ट्रगीत वाजत होतं. त्यावेळी इशान डोळे बंद करुन राष्ट्रगीत गात होता. त्याचवेळी एका मधुमाशीने त्याच्या गालावर हल्ला केला. इशानला लगेच जाणीव झाली. त्याने डोळे उघडले व हालचाल केली. तो पर्यंत मधमाशी उडाली. पुन्हा मधुमाशी आली, तेव्हा त्याने त्याची मान खाली झुकवली.

भारताचा दणदणीत विजय

झिम्बाब्वे विरुद्ध भारताने पहिल्या वनडे सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने 10 विकेट राखून हा सामना जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या सलामीच्या जोडीनेच विजयावर शिक्कामोर्तब केलं. शिखर धवनने 113 चेंडूत 81 आणि शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा फटकावल्या. धवनने 9 चौकार मारले. शुभमनने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. दरम्यान पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहरने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्याने 7 षटकात 27 धावा देऊन सुरुवातीचे 3 विकेट घेतले.

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.