AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs AUSA : भारताने पहिल्या डावात धावा पार करणं टाळलं, 1 रन आधीच डाव केला घोषित; झालं असं की…

इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरला. लखनौमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड फलंदाजी केली. पण चौथ्या दिवशी इंडिया ए संघ ऑस्ट्रेलिया ए पेक्षा 1 धावा मागे असताना डाव घोषित केला. या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

INDA vs AUSA : भारताने पहिल्या डावात धावा पार करणं टाळलं, 1 रन आधीच डाव केला घोषित; झालं असं की...
INDA vs AUSA : भारताने पहिल्या डावात धावा पार करणं टाळलं, 1 रन आधीच डाव केला घोषित; झालं असं की... Image Credit source: PTI
| Updated on: Sep 19, 2025 | 6:07 PM
Share

India A vs Australia A , 1st Unofficial Test Match: भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेट गमवून 532 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने तोडीस तोड उत्तर दिलं. भारतीय संघ 7 गडी गमवून 531 धावा केल्या आणि डाव घोषित केला. यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. भारताच्या हातात तीन विकेट होत्या आणि 1 धाव आरामात करू शकले असते. मग 1 धाव आधीच डाव घोषित करण्यात काय अर्थ होता. कर्णधार श्रेयस अय्यरच्या या निर्णयाची चर्चा रंगली आहे. कारण टीम इंडिया या सामन्यात आरामात लीड घेऊ शकली. पण भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला फलंदाजीसाठई बोलवलं. पण यातून काही वेगळं असं सिद्ध झालंच नाही. उलट हा सामना ड्रॉ झाला.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात 7 गडी गमवून 531 धावा केल्या होत्या. यावेळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ट्री ब्रेक घ्यावा लागला. या सामन्यात शेवटच्या सत्रात काही खास होईल आणि सामना पालटेल असं काही चित्र नव्हतं. पण तरीही कर्णधार श्रेयस अय्यरने डाव घोषित केला. तसेच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करणं भाग पाडलं. पण या रणनितीचा टीम इंडियाला फार काही फायदा झाला नाही. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 56 दावा केल्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ करण्याशिवाय पर्यायच नव्हता.

कसोटी सामन्यात एकूण चार फलंदाजांनी शतकी खेळी केली. यात ऑस्ट्रेलियाकडून 2, भारताकडून 2 फलंदाजांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात सॅम कोन्स्टासने 144 चेंडूत 109 धावांची खेळी केली. तर फिलिपने 87 चेंडूत नाबाद 123 धावा ठोकल्या. भारताकडून देवदत्त पडिक्कलने 281 चेंडूत 150 धावा केल्या. तर ध्रुव जुरेलने 197 चेंडूत 140 दावांची खेळी केली. श्रेयस अय्यर या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याचा डाव फक्त 8 धावांवर आटोपला.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.