Asia Cup 2025 स्पर्धेत त्रिफळाचीत झाल्यानंतरही घेतला डीआरएस, असं का ते पाहा व्हिडीओ
आशिया कप 2025 स्पर्धेतील ब गटातून अफगाणिस्तानचा पत्ता कट झाला आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला आणि गणित फिस्कटलं. श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर 4 मध्ये जागा पक्की केली. दरम्यान, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानच्या डीआरएसची चर्चा रंगली आहे. काय झालं ते समजून घ्या.

आशिया कप स्पर्धेच्या साखळी फेरीत श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. खरं तर हा सुपर 4 साठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने 20 षटकात 8 गडी गमवून 169 धावा केल्या आणि विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्तानच्या डावात 18वं षटक नुवान तुषारा टाकत होता. यावेळी खेळपट्टीवर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान आणि मोहम्मद नबी होता. तेव्हा तुषाराने षटकातील पहिलाच चेंडू स्लोअर यॉर्कर टाकला. यामुळे राशीद फसला. चेंडू बॅटवर येण्याआधीच स्लॉग स्वीप मारण्याच्या नादात चुकला. चेंडू थेट पॅडला लागला आणि स्टंपवर जाऊन लागला. यामुळे मैदानात उपस्थित प्रत्येकाला बाद झाला असं कळलं होतं. पण राशिदने डीआरएस घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
तुषाराने चेंडू टाकल्यानंतर पायाला लागला तेव्हा त्याने एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. त्याला चेंडू स्टंपला लागला हे कळलंच नव्हतं. राशिद देखील त्याच्या अपील नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. त्यामुळे क्लिन बोल्ड झाल्यानंतरही त्याने रिव्ह्यू घेण्यासाठी इशारा केली. कारण त्याला असं वाटलं की पंचांनी एलबीडब्ल्यू दिला आहे. पंच तुषाराला इशारा करू सांगत होते की, राशीद बोल्ड झाला आहे. कारण चेंडू स्टंपला लागून बेल्स पडल्या होत्या. या सामन्यात राशिदने 23 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 24 धावा केल्या. पण या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने निराश केलं. तसेच सामना गवण्याची वेळ आली.
Rashid Khan trying to take DRS for clean bowled decision.😂#RashidKhan #AsiaCup2025 #AsiaCup #AFGvSL #SlvsAfg pic.twitter.com/PjmDOJoH7x
— Shehzad Qureshi (@ShehxadGulHasen) September 18, 2025
अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. तर श्रीलंकेने हे आव्हान 18.4 षटकात 4 विकेट गमवून पूर्ण केलं. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 74 धावांची खेळी केली. आता सुपर 4 फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश हे संघ आहे. तर आशिया कप स्पर्धेतून अफगाणिस्तानचा पत्ता कट झाला आहे.
