IND A vs AUS A: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिक पांड्याचं कमबॅक!
ऑस्ट्रेलिया ए आणि भारत ए यांच्यात मल्टी डे आणि वनडे मालिका होणार आहे. ही मालिका 22 सप्टेंबरपासून सुरू होणार असून भारत ए संघाची घोषणा करण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात

ऑस्ट्रेलिया ए आणि भारत ए यांच्यात होणाऱ्या आगामी मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत दोन मल्टी डे आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील या मालिकेला २२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला मल्टी डे सामना 22 ते 25 सप्टेंबर तर दुसरा मल्टी डे सामना 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल. यानंतर 6, 9 आणि 11 ऑक्टोबर रोजी तीन एकदिवसीय सामने होतील. या दोन्ही मालिकेतील सर्व सामने पुदुचेरी येथे खेळवले जाणार आहेत. निवड समितीने दोन्ही फॉरमॅटसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले आहे. या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मल्टी डे संघाच्या कर्णधारपदी देवदत्त पडिक्कलकडे असणार आहे. तर उपकर्णधारपदी साई सुदर्शन असणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद असेल. तर देवदत्त पडिक्कल उपकर्णधारपद असेल.
हार्दिक पांड्याची संघात निवड
ऑस्ट्रेलिया ए संघाविरूद्धच्या वनडे संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचाही समावेश करण्यात आला असून, पण खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्याचं खेळणं फिटनेस क्लियरन्सवर अवलंबून असणार आहे. हार्दिक पंड्या बऱ्याच काळापासून कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपासून दूर आहे. आगामी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि मोठ्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर, त्याला सराव करता यावा, तसेच त्याच्या फिटनेसचा अंदाज यावा, म्हणून निवड समितीने त्याला भारत ‘ए’ संघात संधी दिली आहे.
🚨 News 🚨
India A squad announced for home series against Australia A, comprising two multi-day matches and three one-day games in Puducherry.
Details 🔽https://t.co/qv3pB2OLhj pic.twitter.com/svfhQbnEoV
— BCCI (@BCCI) September 9, 2026
दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघ
मल्टी डे भारत अ संघ: देवदत्त पडिक्कल (कर्णधार), साई सुदर्शन (उपकर्णधार), अमन मोखाडे, आयुष पांडे, यश राठोड, शेख रशीद, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, अंशुल कंबोज, प्राफुल हिंगे, एन. जगदीसन (विकेटकीपर), नचिकेत भूते आणि विजयकुमार वैशाक (फिटनेसवर अवलंबून).
वनडे सामन्यांसाठी भारत ‘ए’ संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), प्रियांश आर्य, साई सुदर्शन, रजत पाटीदार, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), निशांत सिंधू, विपराज निगम, अर्शिन कुलकर्णी, अरशद खान, नमन धीर, हार्दिक पंड्या (फिटनेसवर अवलंबून), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), गुरजापनीत सिंग आणि यश ठाकूर.
