Cricket : शोएब अख्तरकडून हरभजन सिंहला धक्का, इंडिया-पाकिस्तानचे दिग्गज भिडले! व्हीडिओ व्हायरल
Shoaib Akhtar and Harbhajan Singh Video : ऑन फिल्ड एकमेकांशी भिडणारे हरभजन सिंह आणि शोएब अख्तर हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघांचा एक व्हीडिओ व्हायरल झालाय. अख्तरने या व्हीडिओत भज्जीला जोरात धक्का दिलाय.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 8 संघ सज्ज झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा गतविजेत्या पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेतील सामने हे लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहेत. तर टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. मात्र त्याआधी दुबईतून एक व्हीडिओ समोर आला आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू हरभजन सिंह आणि शोएब अख्तर धक्काबुक्की करत असल्याचं दिसत आहे.
व्हायरल व्हीडिओमध्ये शोएब अख्तर आणि हरभजन दोघेही एकमेकांना डिवचत असल्याचं जिसत आहे. त्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हरभजनला धक्का मारताना दिसतोय. मात्र या दोघांनी हे सर्व गंमतीत केलंय. हा एका ईव्हेंटचा भाग आहे.
दुबईत हरभजन-अख्तरमध्ये काय झालं?
हरभजन सिंह आणि शोएब अख्तर हे दोघेही काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. मात्र या दोघांमध्ये ऑन फिल्ड झालेली हमरीतुमरी क्रिकेट चाहत्यांनी अनेकदा पाहिली आहे. दोघेही ऑन फिल्ड देशासाठी समर्पणाने खेळायचे. मात्र ऑफ फिल्ड दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही एकमेकांची थट्टा मस्करी करतात. असंच काही या दोघांमध्ये दुबईत पाहायला मिळालं.
अख्तरकडून भज्जीला धक्का!
Thats our way of getting ready for Champions Trophy. @harbhajan_singh kee kehnday oh? pic.twitter.com/ZufYlOt7Y4
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) February 9, 2025
व्हायरल व्हीडिओत दोघेही एकमेकांना ललकारताना दिसतय आहेत. भज्जीच्या हातात बॅट आणि अख्तरच्या हातात बॉल पाहायला मिळतोय. दोघेही एकमेकांच्या दिशेने चालून येतात. दोघेही जवळ आल्यानंतर अख्तर भज्जीला धक्का देतो. त्यानंतर भज्जी अख्तरला हातवारे करुन बॉलिंग टाकायला सांगतोय असं वाटतंय.
आयएलटी 20 फायनल
हरभजन आणि अख्तर दोघेही आयएलटी 20 फायनलनिमित्ताने दुबईत होते. तेव्हा या दोघांचा हा व्हीडिओ शूट करण्यात आला. तेव्हा दोघे दुबईतील पारंपरिक वेशभूषेत दिसून आले.
23 फेब्रुवारीला महामुकाबला
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ए ग्रुपमध्ये आहेत. दोन्ही संघ 23 फेब्रुवारीला आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना दुबईत होणार आहे.
