U-19 T20 World Cup: 4,4,4,4,4,6 शेफाली वर्माच तुफान, पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धुतलं, VIDEO

टीम इंडियाची कॅप्टन शेफाली वर्माने आक्रमक बॅटिंग केली. पण 18 वर्षाच्या श्वेता सहरावतने मन जिंकणारी खेळी केली. तिने 20 चौकारांच्या मदतीने धुवाधार नाबाद 92 धावा फटकावल्या.

U-19 T20 World Cup: 4,4,4,4,4,6 शेफाली वर्माच तुफान, पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धुतलं, VIDEO
u-19 world cup team indiaImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 11:22 AM

डरबन: अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने दमदार सुरुवात केली आहे. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने यजमान दक्षिण आफ्रिकेवर सहज 7 विकेटने विजय मिळवला. टीम इंडियाची कॅप्टन शेफाली वर्माने आक्रमक बॅटिंग केली. पण 18 वर्षाच्या श्वेता सहरावतने मन जिंकणारी खेळी केली. तिने 20 चौकारांच्या मदतीने धुवाधार नाबाद 92 धावा फटकावल्या. तिने 17 व्या ओव्हरमध्येच टीमला विजय मिळवून दिला.

गोलंदाजीत दम नव्हता, त्यामुळे….

शनिवार 14 जानेवारीपासून महिला वर्ल्ड कपची सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच महिला अंडर 19 वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलाय. शेफाली वर्माकडे सिनियर लेव्हलवर दोन वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव आहे. तिच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियासमोर यजमान दक्षिण आफ्रिकेच आव्हान होतं. दक्षिण आफ्रिकेने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 166 धावांचा डोंगर उभारला. पण त्यांच्या गोलंदाजीत दम नव्हता. त्यामुळे 17 व्या ओव्हरमध्येच सामना संपला.

दक्षिण आफ्रिकेची दमदार बॅटिंग

बेनोनीमध्ये हा सामना झाला. यजमान दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर सिमोर लॉरेन्सने जबरदस्त बॅटिंग केली. लॉरेन्सने फक्त 44 चेंडूत 61 धावा फटकावल्या. यात 9 चौकार आणि 1 षटकार होता. तिच्याशिवाय मीडल ऑर्डरमध्ये मॅडिसन लॅड्समन (32), कराबो मेसो (19) आणि मियाने स्मिटने (16) धावा केल्या. भारताकडून कॅप्टन शेफाली सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 4 ओव्हरमध्ये 31 धावा देऊन 2 विकेट काढल्या.

शेफालीने एका ओव्हरमध्ये फटकावल्या 26 धावा

टीम इंडियाकडून शेफाली आणि श्वेताची जोडी ओपनिंगसाठी उतरली होती. पहिल्या ओव्हरपासून त्यांनी धावा फटकावायला सुरुवात केली. कॅप्टन आणि व्हाइस कॅप्टनने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांचे चेंडू सीमापार पाठवले. पावरप्लेच्या लास्ट ओव्हरमध्ये शेफालीने वादळी खेळी केली. शेफालीने या ओव्हरच्या पहिल्या पाच चेंडूंवर चौकार लगावले. शेवटच्या चेंडवर सिक्स ठोकून एकाच ओव्हरमध्ये 26 धावा लुटल्या. या बळावर टीम इंडियाने पावरप्लेमध्ये 70 धावा केल्या.

9 फोर, 1 सिक्स

दुर्देवाने शेफाली तिच अर्धशतक पूर्ण करु शकली नाही. ती आठव्या ओव्हरमध्ये आऊट झाली. शेफालीने 16 चेंडूत 45 धावा फटकावल्या. यात 9 चौकार आणि 1 षटकार होता. श्वेताचा हल्लाबोल

कॅप्टन आऊट झाल्यानंतर व्हाइस कॅप्टन श्वेता सहरावतने जबाबदारी संभाळली. तिने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधीच दिली नाही. श्वेताने 17 व्या ओव्हरपर्यंत फटकेबाजी केली. तिची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. पण त्याआधी टीम इंडियाने विजयी लक्ष्य गाठलं. श्वेताने 57 चेंडूत नाबाद 92 धावांची खेळी केली. यात 80 धावा तिने 20 चौकारांमधून केल्या.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.