Rinku Singh | रिंकू सिंह याची पहिल्याच इनिंगमध्ये वादळी खेळी, आयर्लंडला झोडून काढलं, Watch Video
Rinku Singh Ireland vs India 2nd T20I | रिंकू सिंह याने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात फटकेबाजी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या करुन देण्यात मदत केली.

डब्लिन | आयपीएल स्टार रिंकू सिंह याने आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. मात्र पहिल्या सामन्यात पाऊस झाला. टीम इंडिया 2 धावांनी जिंकली. पावसामुळे रिंकू सिंह याच्या बॅटिंगची वेळ आलीच नाही. मात्र रिंकू अखेर दुसऱ्या सामन्यात बॅटिंगसाठी मैदानात आला. रिंकूची बॅटिंग पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. रिंकूने आयपीएलमध्ये आपल्या बॅटिंगने जलवा दाखवला होता. त्यामुळे रिंकू आता मोठ्या पातळीवर कशी बॅटिंग करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागून होता. रिंकूने सुरुवात संयमाने केली. मात्र रिंकूने शेवट मात्र जबरदस्त केला.
ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन या दोघांनी जोरदार फटकेबाजी करत टीम इंडियाला चांगला स्कोअर करुन दिला. मात्र त्यानंतर दोघेही आऊट झाले. संजूने 40 आणि ऋतुराजने 58 धावा केल्या. त्यानंतर रिंकू सिंह आणि शिवम दुबे या दोघांनी दे दणादण फटके मारायला सुरुवात केली. सुरुवातीला शांतीत खेळणाऱ्या रिंकूने आयर्लंडच्या बॉलिंगचा अंदाज घेतला आणि टॉप गिअर टाकला. तर दुसऱ्या बाजूने शिवम दुबे हा देखील जोरात शॉट खेचत होता.
रिंकू सिंह याची फायरिंग
Achi finish ki chinta kyu jab crease par barkaraar ho Rinku 🤩! 🔥#IREvIND #JioCinema #Sports18 #RinkuSingh #TeamIndia pic.twitter.com/QPwvmPPPxK
— JioCinema (@JioCinema) August 20, 2023
पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
रिंकू आणि शिवम दुबे या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. मात्र रिंकू 19.5 व्या बॉलवर आऊट झाला. रिंकूने 21 बॉलमध्ये 180.95 च्या स्ट्राईक रेटने 38 धावा केल्या. रिंकूने या दरम्यान 3 सिक्स आणि 2 फोर ठोकले. म्हणजेच रिंकूने फक्त 5 बॉलमध्ये न धावता 26 धावा केल्या.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.
