AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup: टीम इंडियाच्या निवडीच काऊंटडाऊन सुरु, दोन दिग्गजांच पुनरागमन निश्चित

Asia Cup: आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होतेय. आशियातील टॉप संघांमध्ये सामने होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आशिया कप मध्ये उतरणार आहेत.

Asia Cup: टीम इंडियाच्या निवडीच काऊंटडाऊन सुरु, दोन दिग्गजांच पुनरागमन निश्चित
team india Image Credit source: twitter
| Updated on: Aug 05, 2022 | 12:30 PM
Share

मुंबई: आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होतेय. आशियातील टॉप संघांमध्ये सामने होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आशिया कप मध्ये उतरणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारा आशियाचा प्रत्येक संघ या स्पर्धेत उतरणार आहे. अनेक देशांनी आपले संघ निवडले आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना आशियाई क्रिकेट काऊन्सिलकडे 8 ऑगस्टपर्यंत अंतिम संघाची यादी पाठवायची आहे. भारत 8 ऑगस्टला आशिया कपसाठी आपली टीम निवडणार आहे. त्याचं काऊंटडाऊन सुरु झालय.

दोन खेळाडूंच पुनरागमन निश्चित

आशिया कपसाठी टीम इंडियात कुठल्या-कुठल्या खेळाडूंना संधी मिळू शकते? लवकरच याबद्दलच चित्र स्पष्ट होईल. आशिया कपसाठी भारतीय संघात दोन खेळाडूंच पुनरागमन निश्चित मानलं जात आहे. दीपक चाहर आणि केएल राहुल आशिया कपसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात स्थान मिळवू शकतात, Insidesport.in ने PTI च्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर होते.

आशिया कपमधून टी 20 वर्ल्ड कप साठीचं चित्र होईल स्पष्ट

आशिया कप मध्ये खेळणारा संघ टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कप संघ असेल, असं मानलं जातय. म्हणजे आशिया कप मधून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपच चित्र स्पष्ट होईल.

आशिया कप स्पर्धेच्या नियमानुसार, प्रत्येक संघाला आपल्या 15 खेळाडूंची यादी आशिया क्रिकेट काऊन्सिलकडे सोपवायची आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सिलेक्शन कमिटी आशिया कपसाठी 17 सदस्यीय संघ निवडू शकते.

27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान आशिया कप

आशिया कपच आयोजन 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी केएल राहुल आणि दीपक चाहरची संघात निवड होऊ शकते. केएल राहुलची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड होणार होती. पण कोरोना आणि हर्नियाच्या ऑपरेशमुळे त्याची निवड होऊ शकली नाही. केएल राहुलने टीम इंडियात पुनरागमन केल्यास, तो ओपनिंग करताना दिसू शकतो. मागच्या 6 T20I सामन्यात ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी रोहित शर्मासह ओपनिंग केली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.