AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s Day: ‘या’ आहेत भारतातील ३ सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू! करोडोंची कमाई, एक अनेक मोठ्या ब्रँडच्या मालकीण

भारतात महिला क्रिकेट वाढत आहे. महिला क्रिकेटपटू त्यांच्या दमदार खेळामुळे आणि जगभरातील लोकप्रियतेमुळे चर्चेत आहेत. अशाच काही श्रीमंत महिला क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूया, तसेच महिलादिना निमित्त आपण अशा काही भारतीय क्रिकेटपटू महिल्यांच्या बाबतीत जाणून घेऊयात ज्या आजच्या कोट्यवधींच्या मालकीण आहेत आणि मोठ्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

Women's Day: 'या' आहेत भारतातील ३ सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू! करोडोंची कमाई, एक अनेक मोठ्या ब्रँडच्या मालकीण
Smruti and harmitImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Mar 08, 2025 | 12:55 PM
Share

8 मार्च हा दिवस संपूर्ण जगासाठी खूप खास आहे कारण या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांना समर्पित आहे. आजच्या आधुनिक युगात पाऊल ठेवत असताना प्रत्येक क्षेत्रात महिलांनी बाजी मारलेली आहे. ‘हम किसी से कम नही’ म्हणत महिलांनी जगाच्या पाठीवर जात उंच भरारी घेताना दिसताय. त्यात अनेक क्षेत्रात महिला पुढे जात यशाचे शिखर गाठत आहे. अशामध्ये भारतीय क्रिकेटमध्येही अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि कामगिरीतुन जगभरात भारताचा झेंडा उंचावला आहे.

त्यातच जसजसे नवीन आधुनिक युगात पुढे जात आहोत तसतसे भारतीय महिलांमध्ये क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा अनेक महिला क्रिकेटपटू आहेत ज्या जागतिक क्रिकेटमध्ये आपला झेंडा फडकवत आहेत. स्मृती मानधना ते मिताली राज पर्यंत, अशी काही नावे आहेत ज्यांना सध्या कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांनी कमाईच्या क्षेत्रातही उंच भरारी घेतली आहे. चला तर मग तुम्हाला अशा ३ महिला क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.

1. मिताली राज

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने तिच्या कामगिरीने क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप सोडली आहे. तिला सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू मानले जाते. मिताली राजची एकूण संपत्ती सुमारे 40 ते 45 कोटी रुपये असल्याचे सांगितले जातंय. मितालीने भारतासाठी 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या आकड्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की मिताली राज या महिला क्रिकेटपटूंमध्ये किती क्षमता असेल.

2. स्मृती मानधना

मिताली राजनंतर भारतातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूचे नाव स्मृती मानधना यांचे येते. रिपोर्ट्सनुसार, त्यांची मालमत्ता सुमारे 33 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जातंय. क्रिकेट व्यतिरिक्त त्या ब्रँड एंडोर्समेंटद्वारे देखील चांगली कमाई करतात. स्मृतीने भारतासाठी ७ कसोटी, ९७ एकदिवसीय आणि 148 टी-20 सामने खेळले आहेत.

3. हरमनप्रीत कौर

भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर कमाईच्या बाबतीत खूप पुढे आहे. रिपोर्ट्सनुसार, हरमनप्रीतची कमाई सुमारे 23 ते 26 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ती बूस्ट, एचडीएफसी लाईफ आणि सीईआरटी टायर्सची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. तिने 3 कसोटी, 141 एकदिवसीय आणि 178 टी-20 सामने खेळले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटची गतिशीलता बदलली असल्याने महिला क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे, ज्यामुळे महिला क्रिकेटपटूंचा खेळ खेळण्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. संपत्ती आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या बाबतीत या महिला क्रिकेटपटूंचे स्थान भारतातील महिला क्रिकेटसाठी त्यांची वाढ, मान, मान्यता आणि पाठिंबा दर्शवते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.