
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. या सामन्यात पावसाने 2 वेळा विघ्न घातलं. पहिल्यांदा पावसाने 5 ओव्हरनंतर विघ्न घातलं. त्यामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला. भारताने 9.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 97 रन्स केल्या होत्या. मात्र पाऊस पुन्हा बरसू लागला. पाऊस थांबतच नसल्याने अनेक मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर सामना अखेर रद्द करण्यात आला. भारतासाठी या सामन्यात अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुबमन गिल या तिघांनी बॅटिंग केली. अभिषेकने 19 धावा केल्या. तर सूर्या आणि शुबमन नाबाद राहिले. सूर्या-शुबमनने 39 आणि 37 धावा केल्या. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 31 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा शुक्रवारी 31 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. सलामीचा सामना पूर्ण न झाल्याने चाहत्यांना दुसऱ्या टी 20iची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20i सामना रद्द झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम सुरुवात केली होती. अभिषेक शर्मा, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव या त्रिकुटाने जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे हायस्कोअरिंग सामना पाहायला मिळण्याची शक्यता होती. मात्र पावसामुळे पहिला डावही पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला.
कॅनबेरा येथे पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे पहिला टी20 सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. भारताने 9.4 षटकांनंतर 1 बाद 97 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर पाच षटकात 71 धावांचं आव्हान देण्यात आलं. पण पाऊस सुरुच असल्याने पहिला टी20 सामना रद्द करण्यात आला आहे.
सततच्या पावसाच्या व्यत्ययामुळे भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचा खेळ थांबला आहे. भारताने 9.4 षटकात 1 गडी गमवून 91 धावा केल्या होत्या. मात्र आता भारतीय संघाला फलंदाजी मिळणार नाही. त्यामुळे पाच षटकांचा सामना करण्यात आला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर 71 धावांचं आव्हान दिलं गेलं आहे.
पावसामुळे टीम इंडियाचा डाव आता संपला आहे. जर सामना पुन्हा सुरू झाला तर टीम इंडिया फलंदाजी करणार नाही आणि ऑस्ट्रेलियाला डकवर्थ – लुईस पद्धतीने लक्ष्य दिले जाईल .
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20I सामन्यात पावसाने सलग दुसऱ्यांदा विघ्न घातलं आहे. त्यामुळे खेळ थांबवावा लागला आहे. भारताने 9.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 97 रन्स केल्या आहेत. सूर्यकुमार यादव 39 आणि शुबमन गिल 37 धावांवर नाबाद खेळत आहेत.
सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल या कर्णधार आणि उपकर्णधार जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या जोडीच्या भागीदारीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहचली आहे. त्यामुळे या दोघांना मोठी खेळी करुन भारताला 18 ओव्हरमध्ये 200 धावांपर्यंत पोहचवण्याची संधी याहे.
पावसाच्या विश्रांतींनतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली आहे. भारताने 6 ओव्हरमध्ये 1 विकरेट गमावून 53 रन्स केल्या आहेत. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुबमन गिल ही जोडी मैदानात खेळत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20i सामन्याला पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. खेळाला 3 वाजता सुरुवात होणार आहे.तसेच वेळ वाया गेल्याने आता 20 ऐवजी 18 ओव्हरचा सामना होणार असल्याची माहिती बीसीसीआयने सोशल मीडियावरुन दिली आहे.
UPDATE – Play to resume at 8.30 PM local, 3 PM IST
18 overs per side.
Powerplay to conclude after 5.2 overs.#AUSvIND https://t.co/Buw6GUr8pL
— BCCI (@BCCI) October 29, 2025
महाराष्ट्रप्रमाणे ऑस्ट्रेलियातही पावसाची रिमझिम सुरुच आहे. या पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20i सामना थांबवावा लागला आहे. भारताने खेळ थांबवला तो वर 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 43 रन्स केल्या आहेत. सूर्यकुमार 8 तर शुबमन 16 धावांवर नाबाद खेळत आहे.
शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने भारताला वादळी सुरुवात करुन दिली. या जोडीने 3.4 ओव्हरमध्ये 35 धावा जोडल्या. मात्र नॅथन एलिस याने पाचव्या बॉलवर अभिषेक शर्मा याला टीम डेव्हीड याच्या हाती कॅच आऊट केलं. अभिषेकने 14 बॉलमध्ये 4 फोरसह 19 रन्स केल्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. भारताकडून शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी 20i सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया पहिल्या सामन्यात किती धावा करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
धाराशिव शहरामध्ये अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट. राजकारण बाजूला ठेवा. शहरातील रस्ते आदि करा नागरिकांची मागणी. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यातील राजकारण टोकाला. धाराशिव मधील 117 कोटीच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला नगरविकास विभागाकडून स्थगिती दिल्यावर पेटले राजकारण. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीमुळे स्थगिती देण्यात आल्याची माहिती.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टीम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव(कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी 20i सामन्यात टॉस जिंकला आहे. मिचेल मार्श याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. “आम्हाला पहिले बॅटिंगच करायची होती” अशी प्रतिक्रया भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉसनंतर दिली.
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, टिम डेव्हिड, जोश इंगलिस (विकेटकीपर), मार्कस स्टोयनिस, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, शॉन एबॉट, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड, जोश फिलिप, नॅथन एलिस, तनवीर संघा आणि बेन द्वारशुइस.
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, वाशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, जितेश शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी.
भारतीय संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली एकदिवसीय मालिका 1-2 अशा फरकाने गमावली. त्यानंतर आता उभयसंघात 5 सामन्यांची टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. भारताचा ही मालिका जिंकून एकदिवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे. मालिकेतील पहिला टी 20i सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट या ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.