IND vs ENG : गुरुवारपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात, पहिला सामन्याला किती वाजता सुरुवात?
IND vs ENG 1st Odi Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सलामीचा सामना हा उपराजधानी नागपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. जाणून घ्या सर्वकाही.

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडवर टी 20I मालिकेत 4-1 ने विजय मिळवल्यानंतर आता रोहितसेना एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांसाठी आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी ही मालिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघ या मालिकेतून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने सर्वकाही प्रयोग करुन पाहतील. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघात चांगली चुरस पाहायला मिळू शकते. मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी होणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना कधी?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी 6 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळेल.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा