India vs England 2021 | कॅप्टन कोहलीच्या ‘या’ कारनाम्यांमुळे इंग्लंडच्या गोटात दहशत

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

India vs England 2021 | कॅप्टन कोहलीच्या 'या' कारनाम्यांमुळे इंग्लंडच्या गोटात दहशत
विराट कोहली
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 2:38 PM

चेन्नई : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया  (India vs England Test Series 2021) सज्ज आहे. दोन्ही संघ या मालिकेसाठी जोरदार सराव करत आहेत. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli)  पुनरागमन झालं आहे. विराटच्या कमबॅकमुळे इंग्लंसमोर तगडं आव्हान आहे. विराटने भारतात आतापर्यंत अनेक शानदार रेकॉर्ड्स केले आहेत. यामुळे इंग्लंड टीममध्ये दहशत निर्माण झाली आहे. इंग्लंडला विराटच्या कोणत्या रेकॉर्ड्सची दहशत जाणवत आहे, हे आपण विराटच्या कसोटीतील टॉप 5 रेकॉर्ड्स पाहून जाणून घेणार आहोत. (india vs england 2021 test series 5 big reason of virat kohli that keep england on backfoot)

‘रनमशीन’ विराट

विराटला रनमशीन म्हटलं जातं. त्याने गेल्या 5 वर्षात भारतात पार पडलेल्या कसोटी सामन्यांमध्ये तडाखेबाज कामगिरी केली आहे. विराटने 2016 पासून आतापर्यंत 22 कसोटींमधील 34 डावांमध्ये 2 हजार 499 धावा केल्या आहेत. विराटच्या या रेकॉर्डच्या जवळपासही कोणीही नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आहे. लाबुशेनने 12 टेस्ट मॅचमध्ये 1 हजार 451 रन्स केल्या आहेत.

सर्वाधिक शतक

विराट 2016 पासून ते आतापर्यंत भारतात सर्वाधिक शतकं लगावणारा फलंदाज आहे. त्याने या 5 वर्षांमध्ये एकूण 10 शतक लगावले आहेत. तर याबाबतीत न्यूझीलंडचा केन विल्यमन्सनने 9 सेंच्युरी ठोकल्या आहेत.

बेस्ट बॅटिंग एव्हरेज

विराट कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने भारतात खेळताना नेहमीच चांगल्या सरासरीने धावा केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत एकूण सामन्यांपैकी 39 कसोटी सामने भारतात खेळले आहेत. यामध्ये त्याने 68. 42 च्या सरासरीने रन्स चोपल्या आहेत.

विराटचा कनव्हर्जन रेट शानदार आहे. विराटने नेहमीच आपल्या खेळीचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर केलं आहे. विराटचा 2016 पासून ते आतापर्यंत भारतात खेळलेल्या सामन्यांमधील कनव्हर्जन रेट हा इतर फलंदाजांपेक्षा भारी आहे. विराटला 13 अर्धशतकांचं रुपांतर शतकात करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. त्यामुळे इंग्लंडसमोर या कसोटी मालिकेत विराटला रोखण्याचा आव्हान असणार आहे.

सर्वाधिक दुहेरी शतक

विराटने गत 5 वर्षांमध्ये कसोटीत सर्वाधिक डबल सेंच्युरी लगावल्या आहेत. त्याने एकूण 6 वेळा दुहेरी शतक झळकावलं आहे. विराटनंतर न्यूझीलंडच्या केन विल्यमन्सने 3 दुहेरी शतक लगावले आहेत.

नववर्षाची जोरदार सुरुवातीची अपेक्षा

नववर्षाची सुरुवात तडाखेबंद खेळीने करावी, अशी इच्छा प्रत्येक बॅट्समनची असते. विराटची फॅब फोरमध्ये गणना केली जाते. या फॅब 4 मध्ये विराटशिवाय ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, न्यूझीलंडचा केन विल्यमन्स आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा समावेश आहे. या तिन्ही फंलदाजांनी नववर्षात मोठी धावसंख्या करत जोरदार सुरुवात केली आहे. यामुळे विराटचा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने हे चेन्नईत तर उर्वरित मॅच अहमदाबादमध्ये खेळण्यात येणार आहेत.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

India vs England | इंग्लंडचा कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव होणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी

India vs England | टीम इंडियाचा नेट्समध्ये जोरदार सराव, इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज

(india vs england 2021 test series 5 big reason of virat kohli that keep england on backfoot)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.