India vs England | इंग्लंडचा कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव होणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी

India vs England | इंग्लंडचा कसोटी मालिकेत  3-0  ने पराभव होणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी
Gautam Gambhir

5 फेब्रुवारीपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

sanjay patil

|

Feb 02, 2021 | 11:12 AM

मुंबई : “टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील एकही सामना इंग्लंडला जिंकता (Team India) येणार नाही. इंग्लंडचे फिरकीपटूंमुळे  त्यांना एकही कसोटी जिंकता येणार नाही. त्यांचे फिरकीपटू हे इंग्लंडचे वीक पॉईंट आहेत. टीम इंडिया ही 4 सामन्यांची मालिका 3-0 किंवा 3-1 च्या फरकाने जिंकेल. या मालिकेतील तिसरी कसोटी डे नाईट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडला हा सामना जिंकण्याची 50 टक्केच संधी आहे”, अशी भविष्यवाणी टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केली आहे. गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लान कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस त्याने या मालिकेबाबतचा अंदाज वर्तवला. (England will not win a single Test against Team India predicts Gautam Gambhir)

गंभीर काय म्हणाला?

“इंग्लंडचे फिरकीपटू हे त्यांची उणीवेची बाजू आहे. हे फिरकीपटू इंग्लंडला आपल्या फिरकीच्या जोरावर एकाही सामन्यात विजय मिळवून देतील असं वाटत नाही” असं म्हणत गंभीरने इंग्लंडच्या स्पीन (England spinners) अॅटेकवर टीका केली. इंग्लंडकडे मोईन अली (Moin Ali), डोम बेस (Dom Bess) आणि जॅक लीचसारखे (Jack Leach) फिरकीपटू आहेत. अनुभवी मोईनने 60 सामन्यात 181 विकेट्स घेतल्या आहेत. तर बेस आणि लीचने खेळलेल्या प्रत्येकी 12 सामन्यात 31 आणि 44 विकेट्स घेतल्या आहेत.

डे नाईट सामन्याबद्दल गंभीरची प्रतिक्रिया?

या मालिकेतील एक कसोटी ही दिवस रात्र खेळण्यात येणार आहे. या सामन्यातील परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता इंग्लंडला हा सामन्याची समसमान संधी असेल. भारत ही मालिका 3-0 किंवा 3-1 अशा फरकाने जिंकेल, अंसही गंभीरने स्पष्ट केलं.

रुटबद्दल गंभीर काय म्हणाला?

“इंग्लंडचा कर्णधार जो रुटने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. पण भारतात परिस्थिती वेगळी आहे. रुटसमोर या मालिकेत अनेक आव्हान असणार आहेत. ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराह आणि रवीचंद्रन अश्विनने शानदार गोलंदाजी केली. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा गोलंदाजांसमोर रुटला फलंदाजी करणं, हे नक्की चॅलेंजिग असेल” असं गंभीरने स्पष्ट केलं.

विराटचं कौतुक

“विराटच्या नेतृत्वात संघाने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आणखी उल्लेखनीय. कामगिरी करेल”, असं म्हणत गंभीरने चक्क टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. “मी कधीही विराटच्या वनडे आणि टेस्टमधील नेतृत्वाबाबत टीका केली नाही. फक्त टी 20 मधील कॅप्टन्सीबाबतच मी बोललो आहे”, असं गंभीरने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

Gautam Gambhir | विराटच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील नेतृत्वाबाबत कधीच बोललो नाही : गौतम गंभीर

England Tour India | टीम इंडिया इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 3-1 ने जिंकणार, ब्रॅड हॉगची भविष्यवाणी

(England will not win a single Test against Team India predicts Gautam Gambhir)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें