VIDEO : मोहम्मद सिराजशी नडणाऱ्या बेन स्टोक्सला विराट भिडला, अंपायर्सची मध्यस्थी, भर मैदानात बाचाबाची

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना (India vs England 4th Test) अहमदाबाद येथे खेळवला जात आहे.

VIDEO :  मोहम्मद सिराजशी नडणाऱ्या बेन स्टोक्सला विराट भिडला, अंपायर्सची मध्यस्थी, भर मैदानात बाचाबाची
Virat Kohli vs Ben Stokes
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 4:26 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना (India vs England 4th Test) येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं आहे. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या फिरकीचा जलवा दाखवला. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. या सामन्यावर भारत वर्चस्व गाजवत असताना इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि भारताचा कर्णधार विराट कोहली या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. (India vs England Ahmedabad Test : Virat Kohli clashed with Ben Stokes after Siraj’s bouncer)

अहमदाबाद कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना विराट कोहली आणि बेन स्टोक्स या दोघांमध्ये तू तू मैं मैं पाहायला मिळाली. संपूर्ण प्रकरण मोहम्मद सिराजच्या एका बाऊन्सरपासून सुरू झालं होतं. त्यानंतर विराट कोहली बेन स्टोक्समध्ये बाचाबाची झाली. दोघांच्या बाचाबाचीमुळे वातावरण तापलं, अखेर दोन्ही पंचांना मध्यस्थी करुन हे प्रकरण सोडवावे लागले.

नेमकं काय घडलं?

डावातील 12 व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटचा चेंडू सिराजने बेन स्टोक्सला बाऊन्सर टाकला. यानंतर स्टॉक्सने सिराजकडे पाहात काहीतरी कमेंट केली. पुढचं षटक अक्षर पटेलचं होतं, हे षटक संपताच विराट कोहली बेन स्टोक्सकडे गेला आणि काहीतरी बोलला, मग दोघेजण एकमेकांना उद्देशून काहीतरी बोलू लागले. प्रकरण गरम होऊ लागल्याचे जाणवताच मैदानातील दोन्ही पंचांनी यात मध्यस्थी करत हे प्रकरण सोडवले.

मोहाली कसोटीतही स्टोक्स-कोहली भिडले होते

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. 14 व्या षटकात सिराज गोलंदाजीसाठी आला. त्यानंतर सिराजच्या या षटकात स्टोक्सने तीन चौकार लगावले. दरम्यान, स्टोक्स आणि विराट एकमेकांशी भिडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी उभय संघांध्ये मोहाली येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यातही हे दोघे असेच भिडले होते.

इतर बातम्या

India vs England 4th Test, Day 1 Live Updates | टीम इंडियाची निराशजनक सुरुवात, शुबमन गिल शून्यावर बाद

Video | इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी…!’

IPL 2021 | CSK आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सज्ज, ट्रेनिंग कॅंपसाठी धोनीसह युवा खेळाडू चेन्नईत

(India vs England Ahmedabad Test : Virat Kohli clashed with Ben Stokes after Siraj’s bouncer)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.