AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : क्रिकेटच्या पंढरीवर दुसरा कसोटी सामना, विराटसह भारतीय फलंदाजांचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड चिंताजनक

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर आता दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. हा सामना प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात खेळवला जाईल.

IND vs ENG : क्रिकेटच्या पंढरीवर दुसरा कसोटी सामना, विराटसह भारतीय फलंदाजांचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड चिंताजनक
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 7:33 PM
Share

IND vs ENG : भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांनी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले पण दोघेही कधीच क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स (Lord’s Test) मैदानात शतक ठोकू शकले नाही. सध्या जगातील आणि भारतातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) देखील लॉर्ड्सवर एकही शतक ठोकलेले नाही. दरम्यान आता इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटला लॉर्ड्सवर शतक ठोकण्याची संधी चालून आली आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत सुटल्यानंतर आता दुसरा सामना गुरुवारपासून (12 ऑगस्ट)  लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे. पण या मैदानावर भारतीय फलंदाजाचे रेकॉर्ड खास नसल्याने भारतीय संघावर तणाव आहे. त्यात कर्णधार विराट मागील दोन वर्षांपासून एकही शतक ठोकू शकला नसल्याने चिंतेत आणखीच वाढ झाली आहे. विराटने मागील 9 टेस्ट सामन्यात 15 डावांत एकही शतक ठोकलेले नाही. त्याने नोव्हेंबर, 2019 मध्ये अखेरचे शतक ठोकले होते. कोहलीने लॉर्ड्सवर आतापर्यंत चार डावांत केवळ 65 धावा केल्या आहेत. ज्यात 25 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

भारतीय फलंदाज आणि लॉर्ड्स

विराटनंतर भारताचे इतर फलंदाजही लॉर्ड्सवर आतापर्यंत खास कामगिरी करु शकलेले नाहीत. यात सर्वात विश्वासू फलंदाज असणाऱ्या चेतेश्वर पुजाराही संध्या खास फॉर्ममध्ये नसून मागील 32 डावात एकही शतक ठोकू शकलेला नाही. त्याने लॉर्ड्सवरील दोन सामन्यांतील चार डावात केवळ 89 धावा केल्या आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत लॉर्ड्सवर अद्यापर्यंत एकही सामना खेळलेले नाहीत. केएल राहुलने देखील दोन डावात केवळ 18 धावा बनवल्या आहेत. संपूर्ण संघात केवळ मराठमोळा अजिंक्य रहाणेचीच लॉर्ड्सवरील कामगिरी दिलासादायक आहे. त्याने 2014 साली 103 धावांची शतकी खेळी करत मालिकेतील एकमेव सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता.

हे ही वाचा

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

IND vs ENG : इंग्लंड संघासोबत जोडला जाणार भारताचा कर्दनकाळ, ‘हा’ दिग्गज खेळाडू लवकरच मैदानात

(India vs England Test Series second test at lords ground where virat never scored century)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.