IND vs ENG : इंग्लंड संघासोबत जोडला जाणार भारताचा कर्दनकाळ, ‘हा’ दिग्गज खेळाडू लवकरच मैदानात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 11, 2021 | 10:21 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत सुटली. त्यामुळे दुसऱ्या कसोटी विजयासाठी दोन्ही संघानी कंबर कसली असून इंग्लंडने संघात एका महत्त्वाच्या खेळाडूला खेळवण्याचं ठरवलं आहे.

IND vs ENG : इंग्लंड संघासोबत जोडला जाणार भारताचा कर्दनकाळ, 'हा' दिग्गज खेळाडू लवकरच मैदानात
इंग्लंड कसोटी क्रिकेट संघ

Follow us on

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघाना समान गुण देण्यात आले. या सामन्यात अखेरच्या दिवशी भारताला अवघ्या 157 धावांची गरज असताना पावसामुळे खेळ झालाच नाही. ज्यामुळे हातातोंडाशी आलेला सामना भारताच्या हातातून निसटला. दरम्यान आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याकरता दोन्ही संघ रणनीती आखत आहेत. इंग्लंड संघाने आपला महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय संघाला कायम संकटात टाकणाऱ्या मोईन अलीला (Moeen Ali) बोलावून घेतलं आहे.

मोइन अलीने रविवारी द हंड्रेड स्पर्धेत बर्मिंघम फोनिक्स संघाकडून खेळताना 29 चेंडूत 55 धावा ठोकल्या. त्यामुळे तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने त्याला कसोटी संघात बोलावून घेतलं आहे. तसंच 2014 आणि 2018 च्या कसोटी सामन्यात मोईनने भारताविरुद्ध धमाकेदार प्रदर्शन केलं होतं. मोइन अली मंगळवारी (10 ऑगस्ट) संघासोबत जोडला जाऊ शकतो. तो लवकरच सरावाला मैदानात उतरणार आहे. दमदार इंग्लंड संघाकडे बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीमुळे चांगला अष्टपैलू खेळाडू नसल्याने ती कमी आता मोईन भरणार आहे. काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारीत इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीतही अलीने अप्रतिम प्रदर्शन केलं होतं.

भारताविरुद्ध दमदार रेकॉर्ड

मोइन अली इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध एक घातक खेळाडू म्हणून मागील दोन दौऱ्यात समोर आला होता. भारताने 2014 आणि 2018 मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता.  याचवेळी मोइन अलीने सात सामन्यात 22.22 च्या सरासरीने 31 विकेट्स घेतले होते. यात 2014 च्या साउदम्पटन कसोटीत तर त्याने एका सामन्यात आठ विकेट्सही पटकावले होते. तर 2018 मध्ये अलीने पहिल्या सामन्यात 10 विकेट्स घेतले होते.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट (सामना अनिर्णीत)

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

हे ही वाचा

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO

(England cricket team recalled all rounder moeen ali for India vs England 2nd test)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI