IND vs IRE: हार्दिक पंड्या उमरान मलिकला डेब्युची संधी देईल का? जाणून घ्या कशी असेल Playing 11

भारतीय टीम रविवारी आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) दोन टी 20 सामन्याची सीरीज खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताचे दोन संघ आहेत. एक टीम इंग्लंडमध्ये (India England Tour) आहे.

IND vs IRE: हार्दिक पंड्या उमरान मलिकला डेब्युची संधी देईल का? जाणून घ्या कशी असेल Playing 11
IND vs IRE
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 25, 2022 | 4:04 PM

मुंबई: भारतीय टीम रविवारी आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) दोन टी 20 सामन्याची सीरीज खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताचे दोन संघ आहेत. एक टीम इंग्लंडमध्ये (India England Tour) आहे. दुसरी टीम आयर्लंड दौऱ्यावर आहे. भारताने आयर्लंड दौऱ्यासाठी दुय्यम संघ निवडला आहे. हार्दिक पंड्या (Hardik pandya) आयर्लंड सीरीजमध्ये कॅप्टन आहे. या मालिकेत युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी आहे. दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन या सीरीजमधून पुनरागमन करत आहेत. मुख्य कोच राहुल द्रविड सीनियर संघासोबत इंग्लंडमध्ये आहेत. एनसीएसचे प्रमुख व्हीव्ही एस लक्ष्मण मार्गदर्शक म्हणून संघासोबत आयर्लंडमध्ये आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही सीरीज महत्वाची मानली जात आहे. हा दौरा त्यानंतर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेनंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असेल? ते स्पष्ट होईल.

ओपनिंगला कोण येणार?

ओपनिंगची जबाबदारी पुन्हा एकदा इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्या खांद्यावर असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये दोघे सलामीला यायचे. तिसऱ्या नंबरवर राहुल त्रिपाठीला संधी मिळू शकते. पहिल्यांदाच त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. मधल्याफळीत दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव असतील. सूर्यकुमार यादव मागच्या वर्षभरापासून टीमच्या टी 20 संघाचा नियमित खेळाडू आहे.

उमरान मलिकचा डेब्यु होणार?

गोलंदाजी मध्ये उमरान मलिकला संधी मिळू शकते. भुवनेश्वर कुमार आणि आवेश खानची जागा पक्की आहे. अर्शदीप सुद्धा डेब्युसाठी प्रतिक्षेत आहे. हर्षल पटेलच्या जागी त्याला संधी दिली जाऊ शकते. फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल आहे. आयर्लंड दौऱ्याआधी हार्दिक पंड्याच्या टीमला तीन दिवसांचा ब्रेक मिळाला होता. भारतीय संघ डबलिनमध्ये दाखल झाला आहे. मालिका आणि प्रवासामुळे टीम इंडियातील खेळाडूंना थकवा जाणवू शकतो.

भारताची संभाव्य Playing 11

हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, उमरान मलिक,

आयर्लंडची संभाव्य Playing 11

पॉल स्र्टर्लिंग, अँड्यू बालर्बिनी, गेरथ डेलानी, लोकन टेकटर, जॉर्ड डॉकरेल, अँडी मॅकब्रीन, मार्क एडर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटिल आणि कर्टिस कॅफर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें