IND vs NZ 1st T20 : भारत दौऱ्यात न्यूझीलंडने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने क्लीन स्वीप केलं होतं. पण T20 मध्ये मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड टीमने चित्र बदलय. त्यांनी टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवून तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांच टार्गेट दिलं होतं. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 155 धावा केल्या. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने झुंजार खेळ केला. लास्ट ओव्हरपर्यंत तो क्रीझवर होता. पण तो टीम इंडियाचा पराभव टाळू शकला नाही. त्याने 28 चेंडूत 50 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार लगावले.