
भारताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. भारताकडूून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता ही सलामी जोडी भारतासाठी किती धावांची भागीदारी करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीमने दुसऱ्या टी 20i सामन्यात 200 पार मजल मारली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. न्यझीलंडसाठी कॅप्टन मिचेल सँटनर याने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर रचीन रवींद्र याने 44 धावांचं योगदान दिलं. तर भारतासाठी कुलदीप यादव याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.
हार्दिक पंड्याने याने मार्क चॅपमॅन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हार्दिकने मार्कला अभिषेक शर्मा याच्या हाती 10 धावांवर कॅच आऊट केलं आहे. हार्दिकने यासह आपली पहिली विकेट मिळवली आहे.
भारताने न्यूझीलंडला झटके देण्याचा कार्यक्रम सुरुच ठेवला आहे. कुलदीप यादव याने रचिन रवींद्र याला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. रचीनने 26 बॉलमध्ये 44 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाने मोठी शिकार केली आहे. भारताने न्यूझीलंडला चौथा झटका दिला आहे. शिवम दुबे याने डॅरेल मिचेल याला हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. डॅरेलने 18 धावा केल्या.
कुलदीप यादव याने ग्लेन फिलिप्स याला आऊट करत न्यूझीलंडला तिसरा झटका दिला आहे. कुलदीपने फिलिप्सला हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. फिलिप्सने 13 बॉलमध्ये 19 रन्स केल्या.
टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत न्यूझीलंडला सलग दुसऱ्या ओव्हरमध्ये झटका दिला आहे. हर्षित राणा याने चौथ्या ओव्हरमध्ये डेव्हॉन कॉनव्हे याला आऊट करत न्यूझीलंडला पहिला झटका दिला. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने चौथ्या ओव्हरमध्ये टीम सायफर्ट याला आऊट केलं. भारताने अशाप्रकारे न्यूझीलंडच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत सामन्यात कमबॅक केलं.
टीम इंडियाने न्यूझीलंडला आक्रमक सुरुवातीनंतर पहिला झटका देत सेट जोडी फोडली आहे. हर्षित राणा याने चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर न्यूझीलंडला पहिला झटका दिला आहे. हर्षितने डेव्हॉन कॉनव्हे याला हार्दिक पंड्या याच्या हाती 19 धावांवर कॅच आऊट केलं. कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली.
रायपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने न्यूझीलंडला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट आणि डेव्हॉन कॉनव्हे ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
डेव्हॉन कॉनव्हे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फॉल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी आणि जेकब डफी.
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20I सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचे गोलंदाज न्यूझीलंडला किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
डेव्हॉन कॉनव्हे (विकेटकीपर), टीम रॉबिन्सन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), क्रिश्चन क्लार्क, कायल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी,जेम्स नीशम, मॅट हेन्री, मायकेल ब्रेसवेल, झॅक्री फॉल्क्स आणि बेव्हॉन जेकब्स.
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि कुलदीप यादव.
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध रायपूरमध्ये सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर न्यूझीलंडचा सामना जिंकून पहिल्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण मैदाना मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचा रायपूरमध्ये विजय मिळवून मालिकेतील आघाडी मजबूत करण्याचा मानस असणार आहे. तर न्यूझीलंडसमोर मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील या सामन्याबाबत आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेऊयात.