
टी20 आशिया कप स्पर्धेत भारताने विजयी चौकार मारला आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. भारताने पाकिस्तानला 14 सप्टेंबरला साखळी फेरीत पराभूत केलं होतं. त्यानंतर आता सुपर 4 फेरीत पुन्हा पराभवाची धुळ चारली आहे. पाकिस्तानने विजयासाठी भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 105 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसेच अभिषेक शर्माने तर पाकिस्तानी गोलंदाजांना सोलून काढलं. तर इतर फलंदाजांनी त्यांची जबाबदारी सार्थपणे पार पाडत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजाली. भारताचा या विजयासह अंतिम फेरीचा मार्ग आणखी सुकर झाला आहे.
Irfan Pathan after India vs Pakistan match : टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने पाकिस्तानच्या पराभवानंतर एका मिनिटाच्या आत तीन पोस्ट केल्या. या तीनपैकी एक पोस्ट पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारी होती. वाचा सविस्तर…
भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंमध्ये तणाव सामान्य बाब आहे. आशिया कप 2025 मध्ये सुपर 4 च्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि हॅरिस रौफ यांच्यात सुद्धा काल असाच वाद झाला. मॅच संपल्यानंतर अभिषेक शर्माने नेमकं काय घडलं? त्यावर बोलला. वाचा सविस्तर…
पाकिस्तानचा फलंदाज साहिबझादा फरहान याने टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर गन सेलिब्रेशन केलं. साहिबझादाने या कृतीतून भारतीयांना दुखावल्याचा दावा केला जात आहे. साहिबझादाच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी या मुद्दयावरुन केंद्र सरकारला घेरलं आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीनंतर भारताने सुपर 4 फेरीत पाकिस्तानला दणका दिला आहे. पाकिस्तानने विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 4 गडी गमवून पूर्ण केलं. तसेच 7 चेंडूही शिल्लक ठेवले. भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना रडवलं. खासकरून सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने आक्रमक खेळी केली. पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करू सोडलं. सामना जिंकल्यानंतर भारतीय फलंदाज थेट ड्रेसिंग रुममध्ये गेले. पाकिस्तानी खेळाडूंनी एकमेकांना हँडशेक करत समाधान करून घेतलं. भारताने या विजयासह अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानचं गणित आता किचकट होणार आहे. उर्वरित दोन पैकी एका सामन्यात पराभव होताच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल.
भारताला विजयासाठी 12 चेंडूत 9 धावांची गरज आहे. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा खेळपट्टीवर असून 19 व्या षटकातच विजयाच्या आशा वाढल्या आहेत.
भारताने 17 षटकात 4 गडी गमवून धावा केल्या आहेत. भारताला अजूनही 18 चेंडूत 19 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूनंतर क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढत आहे.
भारताला संजू सॅमसनच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे. संजू सॅमसन 17 चेंडूत 13 धावा करून बाद झाला आहे.
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. शुबमन गिल, सूर्यकुमार यादव याच्यानंतर अभिषेक शर्मा आऊट झावा आहे. अभिषेकने 39 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. अभिषेकने या खेळीत 5 सिक्स आणि 6 फोर ठोकले. भारताने 123 धावांवर तिसरी विकेट गमावली. अभिषेक आऊट झाल्यानंतर संजू सॅमसन मैदानात आला आहे.
टीम इंडियाने अप्रतिम सुरुवात केल्यानंतर झटपट 2 विकेट्स गमावल्या आहेत. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या जोडीने 105 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर भारताने 105 धावांवर पहिली विकेट गमावली. शुबमन गिल 47 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर भारताने 106 धावांवर दुसरी विकेट गमावली. कॅप्टन सूर्यकुमार यादव कॅच आऊट झाला. सूर्याला भोपळाही फोडता आला नाही.
टीम इंडियाने धमाकेदार सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या जोडीने 172 धावांचा पाठलाग करताना 105 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र 10 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर फहीम अश्रफ याने शुबमन गिल याला बोल्ड केलं. शुबमनने 28 बॉलमध्ये 8 फोरसह 47 रन्स केल्या.
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 100 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. या जोडीने 84. ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. अभिषेकने या दरम्यान अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. भारताला आता विजयासाठी आणखी 72 धावांची गरज आहे. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं आहे.
टीम इंडियाचा युवा ओपनर अभिषेक शर्मा याने 24 बॉलमध्ये चौकार ठोकत तडाखेदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 172 धावांचा पाठलाग करताना 8 ओव्हरमध्ये बिनबाद 96 धावा केल्या आहेत.
अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या सलामी जोडीने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद भागीदारी केली आहे.
शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 172 धावांचा पाठलाग करताना भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 31 धावांची नाबाद भागादीरी केली आहे.
अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूपासून आक्रमक सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. अभिषेक शर्माने या स्पर्धेत दुसऱ्यांदा पहिल्या चेंडूवर षटकार मारला आहे.
पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 20 षटकात 5 गडी गमवून 171 धावा केल्या. पाकिस्तान प्रति षटकं 8.55 च्या धावगतीने धावा काढल्या. आता भारतीय संघ दिलेले आव्हान गाठतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या खेळपट्टीवर दिलेली धावसंख्या मागचा रेकॉर्ड पाहता कठीण मानली जाते. या सामन्यात भारतकडून गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. भारतीय संघाला तीन झेल सोडणं चांगलंच महागात पडलं.
मोहम्मद नवाज या सामन्यात धावचीत होत तंबूत परतला. 21 धावा करून बाद झाला. त्याने 19 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारत 21 धावांची खेळी केली.
पाकिस्तानने 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 129 रन्स केल्या आहेत. कॅप्टन सलमान आघा 11 आणि मोहम्मद नवाझ 13 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे पाकिस्तान शेवटच्या 18 बॉलमध्ये धावा करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
शिवम दुबे याने वैयक्तिक दुसरी विकेट घेत पाकिस्तानला चौथा आणि मोठा झटका दिला आहे. शिवमने टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. शिवमने साहिबजादा फरहान याला कॅप्टन सूर्यकुमारप यादव याच्या हाती कॅच आऊट केलं. साहिबजादा याने 45 बॉलमध्ये 58 रन्स केल्या.
कुलदीप यादव याने पाकिस्तानला तिसरा झटका वैयक्तिक पहिली विकेट मिळवली आहे. कुलदीपने हसनैन तलत याला वरुण चक्रवर्ती याच्या हाती कॅच आऊट केलं. हसनैनने 10 धावा केल्या. पाकिस्तानचा स्कोअर 13.1 ओव्हरनंतर 3 आऊट 103 असा झाला आहे.
शिवम दुबे याने पाकिस्तानला तिसरा झटका देत सेट जोडी फोडली आहे. सॅम अयुब शिवमच्या बॉलिंगवर कॅच आऊट झाला. अभिषेक शर्मा याने उडी घेत सॅमचा कॅच घेतला. समॅने 17 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. समॅ आणि साहिबजादा फरहान या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली.
पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहान याने अर्धशतक ठोकलं आहे. साहिबजादा याला टीम इंडियाकडून 2 जीवनदान मिळाले. साहीबजादा याने या संधीचा चांगलाच फायदा घेत पाकिस्तानसाठी अर्धशतक ठोकलं. पाकिस्तानने 10 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 91 धावा केल्या आहेत. साहिबजादा 52 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. तर त्याच्यासोबत सॅम अयुब 21 धावांवर खेळत आहे.
पाकिस्तानने 9 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 83 धावा केल्या आहेत. ओपनर साहिबजादा फरहान 45 आणि सॅम अयुब 20 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर फखर झमान 15 धावांवर बाद झाला. टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 कॅच सोडली. पाकिस्तानने याचा चांगलाच फायदा घेतला.
पॉवर प्लेच्या 6 षटकात पाकिस्तानने 1 गडी गमवून 55 धावा केल्या. यावेळी भारतीय क्षेत्ररक्षकांनी गचाळ क्षेत्ररक्षण केलं. दोन झेल सोडले. त्यामुळे पाकिस्तानला संधी मिळाली.
भारताने पॉवर प्लेमध्ये दोन झेल सोडले. पहिल्यांदा अभिषेक शर्माने झेल सोडला. त्यानंतर कुलदीप यादवने चूक केली. त्यामुळे पाकिस्तानला संधी मिळाली आहे.
पाकिस्तानने चार षटकात 1 गडी गमवून 36 धावा काढल्या आहेत. पाकिस्तानला पॉवर प्लेमध्ये कमी धावांवर रोखण्याचं आव्हान असणार आहे.
पाकिस्तानला फखर जमानच्या रुपाने पहिला धक्का बसला. फखर जमान 15 धावांवर असताना हार्दिक पांड्या स्लोअर आर्म चेंडू टाकला आणि फसला. कट लागून विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातात चेंडू गेला.
पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली आहे. भारताचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहवर तुटून पडले. दुसऱ्या षटकात 3 चौकार मारले. पाकिस्तानने विनाबाद 17 धावा केल्या.
पाकिस्तानने पहिल्या षटकात 6 धावा काढल्या. या सामन्यातील पहिल्या षटकात विकेट घेण्याची संधी भारतीय संघाने गमावली. अभिषेक शर्माने सोपा झेल सोडला.
अभिषेक शर्मा याने पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी संधी गमावली. हार्दिक पंड्या याच्या बॉलिंगवर साहिबजादा फरहान याने मागच्या दिशेने फटका मारला. अभिषेक शर्माला कॅच घेऊन फरहानला आऊट करण्याची संधी होती. मात्र अभिषेकने कॅच सोडला. त्यामुळे फरहानला जीवनदानासह 2 धावाही मिळाल्या. अभिषेकची ही चूक टीम इंडियाला किती महागात पडणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
अभिषेकने सोपा कॅच सोडला
🚨 Abhishek Sharma drops a catch of Sahibzada Farhan in Super Fours of Asia Cup 2025. #AsiaCup2025 #INDvPAK pic.twitter.com/dd96Kd5cUS
— ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) September 21, 2025
भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या मागच्या नऊ टी20 सामन्यात पाठलाग करणाऱ्या संघाने आठ सामने जिंकले आहेतय गेल्या वर्षी न्यू यॉर्कमध्ये झालेल्या टी20 विश्वचषक सामन्याचा अपवाद फक्त एकच आहे.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी फेरीत भारताने प्रथम गोलंदाजी केली होती. तेव्हा पाकिस्तानला रोखण्यात यश आलं होतं. अशाच कामगिरीची अपेक्षा पुन्हा एकदा भारतीय क्रीडाप्रेमी करत आहेत.
भारत पाकिस्तान सामन्यात अँडी पायक्रॉफ्टच सामनाधिकारी असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा लाज गेली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टॉसला अवघ्या काही मिनिटांचा अवधी बाकी आहे. त्याआधी दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांनी उपस्थिती लावली आहे. चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने भारताने अर्शदीप सिंगला खेळवावं असं सुचवलंय.”आशिया कप सुरू होण्यापूर्वी मी जे काही बोललो होतो त्यावर मी ठाम राहीन. मला अर्शदीपला बुमराहसोबत खेळताना पहायचे आहे. कारण अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची आवश्यकता भासू शकते”, असं इरफान पठाण म्हणाला.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानने पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यास नकार दिल्याबद्दल भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी परखडपणे मत मांडलं. एसीसी पुढे जाऊन गुण कमी करण्याचा विचार करू शकते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या 15 पैकी 13 खेळाडूंना आतापर्यंत प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. तर रिंकु सिंह आणि जितेश शर्मा या दोघांना संधी मिळाली नाहीय. त्यामुळे रिंकूची प्रतिक्षा पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून संपणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
संध्याकाळचे 6 वाजले आहेत. तर भारत-पाकिस्तान सामन्याला 2 तासात अर्थात रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टॉस कोण जिंकणार? यासाठी क्रिकेट चाहत्यांना आणखी दीड तास प्रतिक्षा करावी लागणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामन्याला मोजून काही मिनिटं बाकी आहेत. टीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करत आशिया कप 2025 स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी कर्दनकाळ ठरली आहे. तसेच या मैदानात आतापर्यंत 6 पैकी 4 सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर 4 फेरीत होणाऱ्या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. या सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यासाठी आता काही मिनिटांचा वेळ बाकी आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. हार्दिकने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेतली तर तो टी20 फॉरमॅटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.अष्टपैलू हार्दिक पंड्याने 117 सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघासाठी एक मोठी चिंता म्हणजे शुबमन गिलचा फॉर्म. तिन्ही सामन्यांमध्ये गिल सुरुवात चांगली असूनही मोठी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे आज त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
टीम इंडियाने टी 20I आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीत एकूण 3 सामने खेळले आहेत. भारताने हे तिन्ही सामने 2022 टी 20 आशिया कप स्पर्धेत खेळले होते. भारताला 3 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आलाय. तर 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय.
दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या निकाल पाहीला तर भारताचं पारडं जड आहे. भारताने शेवटचे सर्व पाच सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने पाच पैकी 4 जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. गेल्या 5 सामन्यांमधील त्यांचा एकमेव पराभव भारताविरुद्ध होता. 14 सप्टेंबर रोजी आशिया कपच्या ग्रुप लीग सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा विजय निश्चित आहे, असे माजी भारतीय वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी सांगितलं आहे. हस्तांदोलन न करण्याच्या वादाबद्दल प्रसाद म्हणाला की, हस्तांदोलन करायचे की नाही हा संघाचा निर्णय आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांकडून टीम इंडियाच्या चाहत्यांना धमाकेदार कामगिरीची आशा आहे. या दोघांनी आतापर्यंत भारताला अनेक सामन्यांमध्ये विजयी केलंय. ही जोडी पाकिस्तानसाठी किती डोकेदुखी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया सलग चौथ्या विजयासाठी सज्ज आहे. तर पाकिस्तान सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. मात्र पाकिस्तानसाठी असं करणं सोपं ठरणार नाही. पाकिस्तानला सुपर 4 मध्ये जिंकण्यासाठी सलग 3 सामने जिंकणाऱ्या भारताला रोखावं लागेल. त्यामुळे पाकिस्तान हे आव्हान पेलणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दुबईत एकूण 4 टी 20I सामने झाले आहेत. दोन्ही संघांनी समसमान 2-2 सामने जिंकले आहेत. आता उभंयसघात पाचवा सामना होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात पाकिस्तानवर मात करत दुबईत तिसरा टी 20I सामना जिंकणार, असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे.
टीम इंडियाने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया सुपर 4 मध्ये पाकिस्तान विरुद्ध जिंकून विजयी चौकारासाठी सज्ज आहे. त्यामुळे पाकिस्तान टीम इंडियाची विजयी घोडदौड रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाकिस्तान टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. हसन नवाझ याला डच्चू दिला जाऊ शकतो.त्याच्या जागी हुसैन तलत याचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच फखर झमा आणि हॅरिस ओपनिंग करु शकतात. तर सॅम अयुब तिसऱ्या स्थानी बॅटिंगला येऊ शकतो.
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट ऑलराउंडर शिवम दुबे याला बाहेर बसवू शकते. शिवमच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला संधी दिली जाऊ शकते.
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेल याला ओमान विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. अक्षरला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे माहित नाही. मात्र या दुखापतीमुळे अक्षर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे अक्षरबाबत काय निर्णय होतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. भारत-पाक दोन्ही संघ आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीनंतर आता सुपर 4 मध्ये आमनेसामने आहेत. उभयसंघातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 4 सामने झाले आहेत. इथे बरोबरीची लढत राहिली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामेन जिंकले आहेत.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 14 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 14 पैकी 11 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला फक्त 3 वेळाच जिंकता आले आहेत. आकडे पाहता टीम इंडियाच पाकिस्तानवर वरचढ आहे.
गोंदियात देवीमूर्ती घडवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रात्रीचीही शिफ्ट सुरू आहे. अवघ्या 20 दिवसांत देवीमूर्ती साकारण्याचे आव्हान मुर्तीकारांवर होते. देवीच्या 8 फूट उंचीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आगा (कॅप्टन), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ आणि अबरार अहमद.
भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव.
भारताने साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत करत सुपर 4 मध्ये प्रवेश केल्याने ओमान विरुद्धचा सामना औपचारिकता होता. त्यामुळे भारताने ओमान विरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांच्या जागी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या दोघांना संधी दिली होती. मात्र आता टीम इंडिया पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी 2 बदल करु शकते. त्यानुसार पुन्हा बुमराह आणि वरुणचं पुन्हा कमबॅक होऊ शकतं.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आगा (कॅप्टन), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ आणि अबरार अहमद
सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद, हुसैन तलत, हसन अली, खुशदिल शाह, हरिस रौफ, मोहम्मद वसीम आणि सलमान वसीम.
अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग.
आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 निमित्ताने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमेनसामने आहेत. सुपर 4 फेरीत दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे कोणता संघ विजयी सुरुवात करणार? याच्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.