AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND | तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियासोबत वाईट घडलं, सामन्यानंतर समोर आलं खरं सत्य

SA vs IND : टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला पराभूत करत तिसरा सामना जिंकला खरा पण आफ्रिकेच्या संघाने खिलाडूवृत्ती दाखवली नाही. सामन्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला पण तीच गोष्ट टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरली असती.

SA vs IND | तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियासोबत वाईट घडलं, सामन्यानंतर समोर आलं खरं सत्य
| Updated on: Dec 15, 2023 | 10:35 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यंगिस्तानने 106 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. पहिला सामना पावसाने रद्द झाला, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना कराव लागला होता. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. या सामन्यात विजय मिळवला असला तरी सामन्यानंतर एक गोष्ट समोर आली आहे. सुदैवाने त्याचा टीम इंडियाला फटका बसला नाही.

नेमकं काय घडलं?

टीम इंडियाने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्षाचा पाठलाग करताना आफ्रिका संघाची खराब अवस्था झालेली पाहायला मिळाली होती. कारण अवघ्या 95 धावांवर आफ्रिकेचा संघ ऑल आऊट झाला यामध्ये फक्त डेव्हिड मिलर याने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. मिलरला कुलदीप यादव याने बोल्ड करत ऑल आऊट केलं. पण खरं म्हणजे मिलर हा आधीच आऊट झाला होता, तरीपण तो वाचला त्यासाठी त्याचं नशीब म्हणाावं लागेल.

डेव्डिह मिलर याच्याकडे एकट्याच्या दमावर सामना पालटवण्याची ताकद आहे. याआधी अनेक सामन्यांमध्ये तुफानी खेळी करत संघाला सामने जिंकून दिले आहेत. काल झालेल्या सामन्यात 9 व्या ओव्हरमध्ये जडेदजा बॉलिंग करत असताना चौथा चेंडू मिलर याच्या बॅटची कडा घेऊन कीपर जितेश शर्मा याच्या हातात गेला. त्यावेळी मिलरचे नशीब त्याच्या बाजूने होते कारण त्यावेळी डीआरएसउपलब्ध नव्हता. तांत्रिक बिघाडामुळे त्याचा वापर करता येणार नव्हता. मात्र रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की त्याच्या बॅटला चेंडू लागला आहे.

दरम्यान, डेव्हिड मिलरला आऊट असल्याचा जडेजाला विश्वास होता पण डीआरएस उपलब्ध नसल्याने सगळेच हतबल झाले होते. मात्र मिलरलाही त्याचा फार काही फायदा घेता आला नाही. पण जर चमत्कार घडला असला तर  आणि मिलरने सामना जिंकवला असता तर तांत्रिक बिघाड टीम इंडियाच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट ठरला असता.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.