AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: 30 वर्षात धोनीच्या नेतृत्वातच टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत सरस कामगिरी, जाणून घ्या रेकॉर्ड

एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सात भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेत विजयाचा प्रयत्न केला.

IND vs SA: 30 वर्षात धोनीच्या नेतृत्वातच टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत सरस कामगिरी, जाणून घ्या रेकॉर्ड
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 7:26 PM
Share

केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका (India vs South Africa) जिंकण्याच भारताच स्वप्न अखेर भंग पावलं आहे. केपटाऊन कसोटीच्या (Capetown test) चौथ्यादिवशी भारताचा सात विकेटने पराभव झाला. भारताने दिलेले 212 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने सहज पार केले. भारताने ही मालिका 2-1 ने गमावली. आता 19 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आठव्यांदा कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेला होता. पण एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सात भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेत विजयाचा प्रयत्न केला. भारताने आफ्रिकेत सर्वात चांगली कामगिरी 2010-11 मध्ये केली होती. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती.

1992-93 साली मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 0-1 असा पराभव झाला होता. डरबन, केपटाऊन आणि जोहान्सबर्गमधील कसोटी सामने ड्रॉ झाले होते. पोर्ट एलिजाबेथ येथील कसोटीत भारताचा पराभव झाला होता.

1996-97 साली सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला. डरबन आणि केपटाऊन कसोटीत भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

2001-02 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 0-1 असा पराभव झाला. ब्लॉमफाँटेन येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नऊ विकेटने विजय मिळवला होता.

2006-07 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. भारताने शानदार सुरुवात केली. जोहान्सबर्ग कसोटीत यजमानांचा 123 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेत भारताने मिळवलेला हा पहिला कसोटी विजय होता. पण डरबव आणि केपटाऊनमध्ये भारत हरला व मालिका 1-2 ने गमावली.

2010-11 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली. भारतान या दौऱ्यात चांगली कामगिरी केली व मालिका 1-1 अशी ड्रॉ केली. सेंच्युरियनमधल्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाने डरबनमध्ये दुसरी कसोटी 87 धावांनी जिंकली. केपटाऊनची तिसरी कसोटी ड्रॉ झाली.

2013-14 मध्ये पुन्हा धोनीच्या नेतृत्वाखाली टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली. त्यावेळी धोनी ब्रिगेडचा 0-1 ने पराभव झाला. जोहान्सबर्ग कसोटी ड्रॉ झाली. डरबन कसोटीत भारताचा दहा विकेटने पराभव झाला.

2017-18 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. केपटाऊन, सेंच्युरियनमध्ये विराटच्या संघाचा पराभव झाला. जोहान्सबर्ग कसोटीत भारताने 63 धावांनी विजय मिळवला. भारताने ही मालिका 1-2 ने गमावली.

2021-22 मध्ये टीम इंडियाने पुन्हा कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. यामध्ये पहिली सेंच्युरियन कसोटी जिंकली. पण जोहान्सबर्ग, केपटाऊनमध्ये पराभव झाला. भारताने ही मालिका 2-1 ने गमावली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.