AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: बुमराह-जॅनसेन मैदानावरच भिडले, अंपायरला करावी लागली मध्यस्थी, काय आहे प्रकरण?

दोघेही शांत स्वभावाचे खेळाडू आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून दोघे एकत्र खेळलेही आहेत. तरीसुद्धा आज मैदानावर बुमराह आणि जॅनसेनमध्ये शाब्दीक वादावादी झाली.

IND vs SA: बुमराह-जॅनसेन मैदानावरच भिडले, अंपायरला करावी लागली मध्यस्थी, काय आहे प्रकरण?
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 6:08 PM
Share

डरबन: जोहान्सबर्ग कसोटी रंगतदार वळणावर असताना मैदानावर खेळाडूंमध्ये तणावही वाढत चालला आहे. आज मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये शाब्दीक बाचाबाचीच्या दोन घटना घडल्या. आज तिसऱ्यादिवशी मैदानावर ऋषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या रेसी वान डर डुसें यांच्यामधली शाब्दीक बाचाबाची मायक्रोफोनमुळे समजली. पंत आणि डुसें प्रमाणेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मार्को जॅनसेनमध्येही मैदानावर वाद झाला. (india vs south africa johannesburg 2nd test jasprit bumrah marco jansen fight on ground)

दोघेही शांत स्वभावाचे खेळाडू दोघेही शांत स्वभावाचे खेळाडू आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून दोघे एकत्र खेळलेही आहेत. तरीसुद्धा आज मैदानावर बुमराह आणि जॅनसेनमध्ये शाब्दीक वादावादी झाली. जॅनसेन त्याचा अवघा दुसरा कसोटी सामना खेळतोय. पण त्याने आपल्या गोलंदाजीने भारताला दणके दिले आहेत.

बुमराहवर बाऊंसर चेंडूंचा मारा बाऊंसर चेंडूंवरुन बुमराह आणि जॅनसेनमध्ये वाद झाला. 54 व्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज जॅनसेनने बुमराहवर बाऊंसर चेंडूंचा मारा केला. जॅनसेनचा तिसरा चेंडू बुमराहच्या खांद्याला लागला. त्यानंतर जॅनसेनने चौथा चेंडूही बाऊंन्सरचा टाकला. पण बुमराहने स्वत:ला वाचवलं. त्यानंतर जॅनसेनने बुमराहला ठसन दिली व दोघांमध्ये काही बोलणे झाले.

दोघांची देहबोली आक्रमक होती जॅनसेन रनअप घेण्यासाठी जात असताना, बुमराह पुढे येऊन काहीतरी बोलला. जॅनसेन आणि बुमराह परस्परांच्या खूपच जवळ आले. दोघांची देहबोली आक्रमक होती. त्यावेळी वातावरण शांत करण्यासाठी अंपायरला मध्यस्थी करावी लागली. पंचांनी बुमराहला शांत राहण्यास सांगितले.

बुमराहने मारला षटकार जॅनसेनच्या षटकानंतर रबाडाने सुद्धा बुमराहला बाऊंसर गोलंदाजी केली. पण बुमराहने शानदार षटकार मारला. त्यावेळी पॅव्हेलियनमध्ये उपस्थित संघाने टाळ्या वाजवून बुमराहचे कौतुक केले.

संबंधित बातम्या:

IPL 2022: ‘नाम के हकदार पेहेले आप’, आयपीएलमध्ये लखनऊ संघाच्या बाबतीत पहिल्यांदाच असं घडणार Ajinkya Rahane| करीअर संकटात सापडल्यानंतर रहाणे आणि पुजाराची बॅट तळपली Rishabh Pant| ‘नॅचरल खेळ वैगेर बकवास बंद करा’, गावस्कर ऋषभ पंतवर भडकले

(india vs south africa johannesburg 2nd test jasprit bumrah marco jansen fight on ground)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.