India vs South Africa, 4th T20I Updates : धुक्यांमुळे चाहत्यांची घोर निराशा, लखनौमधील सामना रद्द

India vs South Africa, 4Th T20i Highlights and Updates In Marathi : धुक्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे मोठ्या आशेने सामना पाहण्यासाठी आलेल्या लखनौतील क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. या चाहत्यांनी स्टेडियममधून बाहेर पडल्यानंतर माध्यमांसमोर संताप व्यक्त केला.

India vs South Africa, 4th T20I Updates : धुक्यांमुळे चाहत्यांची घोर निराशा, लखनौमधील सामना रद्द
IND vs SA 4th T20i Live Updates
Image Credit source: Tv9
| Updated on: Dec 18, 2025 | 3:08 AM

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील चौथ्या सामन्याचं बुधवारी लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं.  टीम इंडिया या मालिकेत 3 सामन्यांनंंतर 2-1 ने आघाडीवर होती. त्यामुळे टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. तर दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना करो या मरो असा होता. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार असल्याचं अपेक्षित होतं. मात्र हा सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला. पंचांकडून 6 वाजून 50 मिनिटं ते 9 वाजून 25 मिनिटं या दरम्यान एकूण 6 वेळा पाहणी करण्यात आली. त्यानंतरही खेळण्यासारखी स्थिती नसल्याने हा सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.

 

 

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 17 Dec 2025 09:32 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : धुक्यांमुळे चाहत्यांची घोर निराशा, लखनौमधील सामना रद्द

    लखनौमधील चौथा आणि निर्णायक टी 20i सामना हा अखेर रद्द करण्यात आला आहे. लखनौतील एकाना स्टडेयिममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र धुक्यांमुळे हा सामना झाला नाही. हा सामना टॉसविना रद्द करण्यात आला आहे.

  • 17 Dec 2025 09:05 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : धुक्यांमुळे चाहत्यांची पुन्हा निराशा, आता 9 वाजून 25 मिनिटांनी पाहणी

    धुक्यांमुळे चाहत्यांची निराशा कायमच आहे. पंचांनी 9 वाजता पाहणी केली. मात्र या पाहणीतही काही फैसला झाला नाही. त्यामुळे आता 9 वाजून 25 मिनिटांनी पाहणी होणार आहे. या पाहणीत काय होतं का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 17 Dec 2025 08:37 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : अरे चाललंय काय? चाहत्यांचा संताप, आता 9 वाजता होणार पाहणी

    लखनौमध्ये धुक्यांमुळे चाहत्यांचा संताप पाहायला मिळत आहे.  धुक्यांमुळे  रात्री 9 वाजेपर्यंत टॉस होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पंचांनी साडे आठ वाजता मैदानात येऊन पाहणी केली. त्यानंतर आता रात्री 9 वाजता पुढील पाहणी केली जाणार आहे.

  • 17 Dec 2025 08:07 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : चाहत्यांना टॉसची प्रतिक्षा, धुक्यामुळे चौथा टी 20i सामना रद्द होणार?

    लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये गेल्या दीड तासांपासून चाहत्यांना टॉसची प्रतिक्षा आहे. लखनौमध्ये धुक्यांमुळे अजूनही टॉस झालेला नाही. नियोजित वेळेनुसार 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र आता 8 नंतर साडे आठ वाजता पुढील पाहणी होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

  • 17 Dec 2025 07:46 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : धुक्यामुळे टॉसला विलंब, 8 वाजता होणार फैसला

    धुक्यामुळे आतापर्यंत चौथ्या टी 20i सामन्यातील 1 तासाचा खेळ वाया गेला आहे. लखनौत आतापर्यंत टॉसही झालेला नाही.  बीसीसीआयकडून आता रात्री 8 वाजता पुढील पाहणी केली जाणार आहे.

  • 17 Dec 2025 06:58 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : धुक्यामुळे टॉसला विलंब, चाहत्यांची निराशा, आता साडे सात वाजता होणार फैसला

    धुक्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. चौथ्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र धुक्यामुळे अजून टॉस झालेला नाही. आता थेट संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर टॉस किती वाजता होणार? हे ठरवलं जाईल.

  • 17 Dec 2025 06:37 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : धुक्यामुळे टॉसला विलंब, चाहत्यांची निराशा

    टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या टी 20i सामन्यातील नाणेफेकीला धुक्यामुळे विलंब झाला आहे. टॉस 6 वाजून 30 मिनिटांनी होणं अपेक्षित होतं. मात्र धुक्यामुळे नाणेफेकीला विलंब झाला आहे. त्यामुळे आता 6 वाजून 50 मिनिटांनी पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर टॉस केव्हा होणार? हे निश्चित केलं जाणार आहे.

  • 17 Dec 2025 06:14 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी 20I सामना, किती वाजता सुरुवात

    टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाचा चौथा सामना जिंकून मालिका नावावर करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

  • 17 Dec 2025 06:09 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया

    अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार) , सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह.

  • 17 Dec 2025 06:08 PM (IST)

    IND vs SA 4th T20i Live Updates : टी 20i मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम

    रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्रक्रम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फेरेरा, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्खिया, लुंगी एन्गिडी, ओटनील बार्टमन, डेव्हिड मिलर, केशव महाराज, जॉर्ज लिंडे, टोनी डी झोर्झी, लुथो सिपामला आणि क्वेना माफाका.