Virat Kohli: राहुलची कॅप्टनशीप ते पुजारा-रहाणे अनमोल, विराटच्या पत्रकार परिषदेतले दहा महत्त्वाचे मुद्दे

विराट सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. आज विराटने पत्रकार परिषद घेऊन स्वत:च्या फिटनेसपासून ते पुजार-रहाणेचा फॉर्म या सर्वाबद्दल उत्तर दिली.

Virat Kohli: राहुलची कॅप्टनशीप ते पुजारा-रहाणे अनमोल, विराटच्या पत्रकार परिषदेतले दहा महत्त्वाचे मुद्दे
विराट कोहली

विराट कोहलीने आज दक्षिण आफ्रिकेत पहिली पत्रकार परिषद घेतली. विराट सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. आज विराटने पत्रकार परिषद घेऊन स्वत:च्या फिटनेसपासून ते पुजार-रहाणेचा फॉर्म या सर्वाबद्दल उत्तर दिली. (India vs South Africa Ten important points in Virat Kohli Press Conference)

जाणून घ्या विराटच्या पत्रकार परिषदतले दहा महत्त्वाचे मुद्दे

1 फिट राहण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण आम्ही जास्त क्रिकेट खेळतोय. मी फिट असतो. बऱ्याच काळापासून आयपीएल आणि तीन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. जाडेजाही तसाच खेळतोय. दुखापत होणं हे नैसर्गिक आहे.

2 संघासाठी जास्त जास्त चांगलं करण्याचा माझा प्रयत्न असतो. सतत तशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असतो. ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. संघासाठी चांगलं करण्याचा माझ्या प्रयत्न असतो. मला कोणाला काही सिद्ध करायचे नाहीय.

3 मी जेव्हा कर्णधार झालो, तेव्हा टीम सातव्या क्रमांकावर होती. पण आता आम्ही मजबूत स्थितीमध्ये आहोत. हा खूप कठिण प्रवास होता. तुम्ही त्वेषाने खेळला नाही, तर असं यश मिळणं कठिण आहे. आमच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. प्रत्येक सामन्याआधी कन्फ्यूजन असतं, कोणाला घेऊन खेळायचं. याचा आम्हाला गर्व वाटतो. हे वेगवान गोलंदाजांच्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आमच्या यशाचं रहस्य हे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनी खूप मेहनत केलीय.

4 मी पूर्णपणे फिट आहे. पण मोहम्मद सिराज पूर्णपणे फिट नाहीय. मॅचसाठी तो फिट नाहीय. पण मी पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात मोहम्मद सिराज खेळणार नाही.

5 विराट कोहलीने पत्रकार परिषदेत भारताच्या मधल्याफळीचे समर्थन केले. मागच्या कसोटीत पुजारा आणि रहाणेने चांगली फलंदाजी केली. त्यांचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दोघांनी स्वत:ला सिद्ध केलय. ऑस्ट्रेलियातही त्यांनी दाखवून दिलय. मोक्याच्या क्षणी ते चांगला खेळ दाखवतात.

6 विराट कोहलीने केएल राहुलने ज्या पद्धतीने कर्णधारपद भूषवलं, त्याचं कौतुक केलं. राहुलने संघाला विजय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी असतो, तर काही वेगळं केलं असतं. पण संघाला विजय मिळवून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो.

7 ऋषभ पंतसोबत टीम मॅनेजमेंटने चर्चा केली आहे. सरावादरम्यान त्याच्याशी चर्चा केली आहे. चुका सगळ्यांकडून होतात. पण त्या चुकांमधून शिकणं खूप महत्त्वाचं असतं. कधी कुठला फटका खेळायचा ते समजणं महत्त्वाचं आहे. ऋषभलाही ही गोष्ट समजते.

8 विराट कोहलीला ऋषभ पंतच्या शॉट सिलेक्शनबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्याने करीयरच्या सुरुवातीला एमएस धोनीकडून मिळालेल्या शिकवणीचे स्मरण केले. दोन चुकांमध्ये कमीत कमी सहा ते सात महिन्यांचं अंतर असलं पाहिजे. तरच करीयर पुढे जातं.

9 दुसरी कसोटी खेळू शकलो नाही, त्या बद्दल स्वत:ला दोषी समजतो. तुम्ही म्हणाल मला दुखापत कशी झाली. पण प्रवास, ट्रेनिंग, क्रिकेट खेळताना असे होऊ शकते. यावरुन तुम्ही खेळताय हे कळते. यामुळे निराश होऊन चालणार नाही.

10 विराट कोहली उद्याच्या कसोटीत खेळणार आह. त्यामुळे उद्या भारतीय संघ मजबूत स्थितीमध्ये असेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI