IND vs WI: वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित कर्णधार, विराट खेळणार, बुमराहला विश्रांती

IND vs WI: वेस्ट इंडिज विरोधातील टी-20 आणि एक दिवसीय सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजसाठी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.

IND vs WI: वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित कर्णधार, विराट खेळणार, बुमराहला विश्रांती
India vs West Indies: Rohit Sharma Back As Captain, Ravi Bishnoi Earns Maiden Call Up For ODI and T20 Series
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 12:58 AM

नवी दिल्ली: वेस्ट इंडिज विरोधातील टी-20 आणि एक दिवसीय सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजसाठी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात होणाऱ्या या सीरिजमध्ये विराट कोहली खेळणार आहे. तर सीरिजमधून भुवनेश्वर कुमाराला डच्चू देण्यात आला असून जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. या शिवाय लेग स्पिनर रवि बिश्नोई (Ravi Bishnoi), दीपक हुड्डाला पहिल्यांदाच संघात घेण्यात आलं आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची सीरिज होणार आहे. ही सीरिज 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. वनडे सामने अहमदाबादेत खेळवले जाणार आहेत. तर टी-20 सीरिज कोलकातामध्ये होणार आहे.

टीम इंडियात रोहित शर्माचे पुनरागमन झालं आहे. तसेच त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टीम इंडियात कुलदीप यादवचंही पुनरागमन झालं आहे. कुलदीप यादवला वनडे संघात घेतलं आहे. तर लेग स्पिनर रवि बिश्नोई, दीपक हुड्डाला पहिल्यांदाच संघात घेण्यात आलं आहे. रवि बिश्नोईला वनडे आणि टी-20 सीरिजसाठी संघात घेतलं आहे. तर हुड्डाला केवळ वनडे सीरिजमध्ये घेण्यात आलं आहे. आर. अश्विनला मात्र संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

बुमराह, शमीला विश्रांती

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमाराला संघातून डच्चू देण्यात आला होता. परंतु, टी-20मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. व्यंकटेश अय्यरलाही एक दिवसीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर शिखर धवनला टी-20 तर इशान किशनला वनडेतून डच्चू देण्यात आला आहे. या सीरिजसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलही पहिल्या वनडेत खेळणार नाहीत. रवींद्र जडेजा अजून बरा झालेला नाही. त्यामुळे त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही.

कुलदीप यादवचे पुनरागमन

गेल्या काही वर्षापासून कुलदीप यादवला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढ-उतार पाहावे लागले होते. अनेकदा त्याला संघातून बाहेर राहावे लागले आहे. गेल्यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाच्या बी टीममध्ये त्याला संधी देण्यात आली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या सीरिजमध्ये कुलदीपला स्थान मिळाले नव्हते. एवढेच नव्हे तर आयपीएलमध्येही केकेआरने कुलदीपला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. जखमी झाल्याने त्याला संघाबाहेर राहावे लागले होते. मात्र, यावेळी त्याला संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवचा वनडे आणि टी-20 रेकॉर्ड अत्यंत चांगला आहे. कुलदीपने 65 वनडे सामन्यात 107 बळी घेतले होते. टी-20मध्येही त्याने 23 सामन्यात 41 विकेट घेतले होते.

रवि बिश्नोईवर विश्वास

21 वर्षीय लेग स्पिनर रवि बिश्नोईला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. बिश्नोईने आतापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामन्यात 24 बळी घेतले आहेत. लखनऊन सुपर जायंट्सने त्याला आपल्या संघात स्थान दिलं होतं. बिश्नोईने 23 आयपीएल मॅचेसमध्ये 24 विकेट घेतले आहेत.

असा आहे वनडे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सीराज, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.

टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सीराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान और हर्षल पटेल.

संबंधित बातम्या:

MS Dhoni: धोनीच्या जुन्या मित्राने म्युझियमची काच फोडली; पहा VIDEO

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू घाबरले, पाकिस्तान दौरा रद्द होणार?

पंतप्रधान मोदींच्या पत्राला जॉन्टी रोड्सने दिले खास उत्तर, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल…

Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.