वेस्ट इंडिजविरुध्द कुलदीप यादव मैदानात, रवी बिश्नोईचीही निवड होऊ शकते

6 फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुलदीप यादवचे संघात पुनरागमन निश्चित असून रवी बिश्नोईची संघात प्रथमच निवड निश्‍चित मानली जात आहे.

वेस्ट इंडिजविरुध्द कुलदीप यादव मैदानात, रवी बिश्नोईचीही निवड होऊ शकते
Kuldeep Yadav
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 7:00 AM

वेस्ट इंडिजविरुद्ध (west indies) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ लवकरच जाहीर होणार आहे. या संघात कुलदीप यादवचे (kuldeep yadav) नाव निश्‍चित समजले जात आहे. या मालिकेपासून कुलदीपचे संघात पुनरागमन होत आहे. कुलदीप यादवची कारकीर्द गेल्या 2-3 वर्षात चढ- उतारांची राहिलेली आहे. गेल्या वर्षी तो गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने त्याचा संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादव शिवाय रवी बिश्नोईचीही (ravi bishnoi) पहिल्यांदा टी-20 मालिकेसाठी निवड निश्‍चित समजली जात आहे. दरम्यान, भुवनेश्वर कुमारला एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले असले तरी टी-20 संघात त्याची निवड करण्यात आलेली नसल्याचीही माहिती मिळाली आहे. माजी कर्णधार विराट कोहलीला दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. कोहली आणि रवी शास्त्री यांच्या काळात कुलदीपला विशेष प्राधान्य दिले जात नव्हते पण आता तो संघातील ‘ट्रम्प कार्ड’ बनू शकतो. कुलदीपचे गेल्या वर्षी गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते.

रोहितचा कुलदीपवर विश्वास

कुलदीप यादवच्या निवडीत कर्णधार रोहित शर्माचा मोठा हात असण्याचे सांगण्यात येत आहे. रोहित आता कर्णधार आहे आणि त्याला कुलदीपच्या प्रतिभेवर प्रचंड विश्वास आहे. कुलदीप यादवचा एकदिवसीय आणि टी-20 विक्रम अप्रतिम आहे. या डावखुऱ्या गोलंदाजाने 65 एकदिवसीय सामन्यांमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत. T20 मध्येही कुलदीपने 23 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत.

रवी बिश्नोई पहिल्यांदाच संघात

लेगस्पिनर रवी बिश्नोईला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी मिळाली आहे. अंडर 19 क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, बिश्नोईला आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने संधी दिली होती. ज्यामध्ये त्याने 23 सामन्यांमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत. बिश्नोईचा नुकताच लखनौच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

यांना जागा मिळाली नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर. अश्विन वेस्ट इंडिज मालिकेत खेळणार नाही. अश्विन पुढील दीड महिना विश्रांती घेणार आहे. रवींद्र जडेजा नक्कीच तंदुरुस्त आहे पण त्याला आणखी काही काळासाठी विश्रांती देण्यात येत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू ऋषी धवनलाही संधी मिळालेली नाही.

वेस्ट इंडिजचा भारत दौरा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका अहमदाबाद येथे खेळवली जाणार आहे. हे सामने 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला होणार आहेत. त्याचबरोबर टी-20 मालिकेतील तिन्ही सामने कोलकातामध्ये खेळवले जातील. 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला टी-20 सामने खेळवले जातील.

;

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.