IND vs WI: संतापलेल्या रोहित शर्माने मैदानावरच चेंडूला लाथ मारली, कारण….पहा VIDEO

IND vs WI: टी-20 च्या दुसऱ्या रोमांचक सामन्यात काल भारताने वेस्ट इंडिजवर (India vs West indies) आठ धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेले 187 धावांचे लक्ष्य पार करताना वेस्ट इंडिजने निर्धारीत 20 षटकात तीन बाद 178 धावा केल्या.

IND vs WI: संतापलेल्या रोहित शर्माने मैदानावरच चेंडूला लाथ मारली, कारण....पहा VIDEO
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 8:12 AM

कोलकाता: टी-20 च्या दुसऱ्या रोमांचक सामन्यात काल भारताने वेस्ट इंडिजवर (India vs West indies) आठ धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेले 187 धावांचे लक्ष्य पार करताना वेस्ट इंडिजने निर्धारीत 20 षटकात तीन बाद 178 धावा केल्या. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने आता 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजचा मधल्याफळीतील फलंदाज रोव्हमॅन पॉवेल (Rovman powell) नाबाद (68) आणि निकोलस पूरन (62) (Nicholas Pooran) मैदानावर फटकेबाजी करत असताना वेस्ट इंडिज सामना सहज जिंकणार असंच वाटत होतं. दोघांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करत भारतीय गोलंदाजी फोडून काढली. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 100 धावा जोडल्या. सामन्याचं पारडं वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकतय असं चित्र असताना शेवटच्या तीन षटकात खेळ बदलला. भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलने टिच्चून मारा केला.

मोठे फटके खेळू दिले नाही

पॉवेल आणि पूरनला मोठे फटके खेळू दिले नाहीत. त्यामुळे सामना भारताच्या बाजूने फिरला. शेवटच्या षटकात पॉवेलने दोन षटकार ठोकून भारतीय चाहत्यांच टेन्शन वाढवलं होतं. पण हर्षल पटेलने शेवटच्या दोन चेंडूंवर मोठे फटके खेळू दिले नाहीत, तिथेच सामना भारताने जिंकला.

या सामन्यात एक क्षण असाही आला होता, जेव्हा रोहित शर्मा चिडल्याचं दिसलं. त्याने संतापाच्या भरात मैदानात बॉलला लाथ मारली व भुवनेश्वर कुमारला काहीतरी बडबडला.

नेमकं काय घडलं?

सामन्याचं 16 व षटक सुरु होतं. रोव्हमॅन पॉवेल आणि निकोलस पूरनची जोरदार फटकेबाजी सुरु होती. ही जोडी फोडणं आवश्यक होतं. फिरकी गोलंदाजी असो वा वेगवान हे दोघे कोणालाच दाद देत नव्हते. सामना पूर्णपणे वेस्ट इंडिजच्या हातात दिसत होता. अशावेळी ही जोडी फोडणं, विकेट काढणं अत्यावश्यक बनलं होतं. भुवनेश्वर कुमारला 16 व्या षटकात ही संधी होती. त्याच्या गोलंदाजीवर रोव्हमॅन पॉवेलने मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू उंच टोलवला. भुवनेश्वर कुमार हा झेल सहज घेऊ शकला असता, पण मोक्याच्या क्षणी त्याने तो झेल सोडला. त्यामुळे जवळचा उभा असलेला रोहित शर्मा चिडला. त्याने मैदानावर बॉलला लाथ मारली. अशा प्रसंगात झेल सोडणं टीम इंडियाला परवडणार नव्हतं.

भुवनेश्वरचं 19 व षटक ठरलं निर्णायक

भुवनेश्वर कुमारने सोडलेला झेल महाग पडणार असं दिसत असतानाच, 19 व्या षटकात त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. भुवनेश्वरने त्या षटकात चार धावा देत निकोलस पूरनचा महत्त्वाचा विकेट मिळवला. त्यामुळे 20 व षटक टाकणाऱ्या हर्षल पटेलच काम थोडं सोप झालं. अखेरच्या षटकात गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारचा अनुभव दिसून आला. त्याने यॉर्कर चेंडूचा मारा करताना पॉवेलला मुक्तपणे फटकेबाजी करु दिली नाही.

India vs West indies Rohit Sharma Kicks The Ball Angrily After Bhuvneshwar Kumar Drops Rovman Powell Off His Own Bowling

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.