Birthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका सामन्यात या खेळाडूने एका दिवसातच तिहेऱी शतक ठोकलं. पण अवघ्या 27 वर्षाच्या वयातच या दिग्गज खेळाडूने क्रिकेटला राम राम ठोकला.

Birthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक
दलीपसिंहजी क्रिकेट खेळताना

लंडन : एका अशा क्रिकेटपटूबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत ज्याचा जन्म तर भारतात झाला पण तो क्रिकेट मात्र इंग्लंडसाठी खेळला. याचे कारण त्या वेळेस भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते आणि भारताची स्वत:ची क्रिकेट टीम नव्हती. या क्रिकेटपटूच्या परिवारातील अनेक जण क्रिकेट खेळत होते. पण त्याने केलेली कामगिरी सर्वांपेक्षा धडाकेबाज होती. केवळ 12 कसोटी सामने खेळूनही त्यात त्याने 58 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला. एका प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यात तर या खेळाडूने एका दिवसातच तिहेरी शतकही ठोकलं होतं. अशा या दिग्गज खेळाडूच नाव कुमार श्री दलीपसिंहजी (Duleepsinhji) असं असून त्यांचा आज वाढदिवस आहे. (Indian Born Cricketer Duleepsinhji Played FOr England Todays is his Birthday)

दलीप यांचा जन्म 13 जून 1905 रोजी गुजरातच्या सरोदर येथे झाला होता. त्यांचे जामनगर राजघराण्याशी संबध होते. त्याचे काका रणजीतसिंहजी हे देखील क्रिकेटर होते. दलीप यांना इंग्लंडमध्ये मिस्टर स्मिथ म्हटलं जायचं. त्यांनी आठ सीजन प्रथम श्रेणी सामने खेळले ज्याच 205 सामन्यांत 49.95 च्या सरासरीने 15 हजार 485 धावा केल्या. 333 रन हा त्यांचा सर्वोच्च स्कोर होता. त्यांनी 50 शतकांसह 64 अर्धशतक ही ठोकले. सोबतच स्लिपमध्ये त्यांचे क्षेत्ररक्षण ही उत्तम होते. तिथे त्यांनी 256 कॅच पकडले होते. दलीपसिंह जी 1926 मध्ये काउंटी क्रिकेटच्या ससेक्स संघासोबत जोडले गेले होते. त्यानंतर 1932 पर्यंत
त्यांची धावा करण्याची सरासरी सर्वांपेक्षा अधिक होती. याच दरम्यान 1930 मध्ये नॉर्थम्पटनशरच्या विरुद्ध त्यांनी एका दिवसात 333 धावांची एक उत्कृष्ट खेळी केली होती.

आजारपणामुळे सोडावे लागले क्रिकेट

दलीप यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन वेळेस एका सामन्यातील दोन्ही डावांत शतक लगावले होते. प्रत्येक सीजनमध्ये त्यांची सरासरी ही वाढत होती. मात्र सुरुवातीपासूनच त्यांची प्रकृती ठिक नसायची. सतत आजारपणामुळे डॉक्टरांनी त्यांना क्रिकेट सोडण्यास सांगितले. त्यामुळे 27 वर्षाच्या वयातच त्यांनी 1932 मध्ये क्रिकेटला राम राम ठोकला.

इंग्लंडसाठीची कामगिरी

इंग्लंडसाठी दलीप यांनी 12 सामने खेळले. मैच खेले. यावेळी ऑस्ट्रेलिया विरोधात पहल्या कसोटीतच त्यांनी 173 धावांची दमदार खेळी केली. त्यांनी संपूर्ण कसोटी क्रिकेटमध्ये 12 सामन्यांत 58.52 च्या सरासरीने 995 रन्स कुटले. ज्यात तीन शतकं आणि पाच अर्धशतकांचा सामावेश होता. 173 हा त्यांचा सर्वोच्च स्कोर असून आजारपणामुळे त्यांना 27 वर्षाच्या वयात क्रिकेटमधून संन्यास घ्यावा लागला. भारताच्या स्वांतत्र्यानंतर 1949 मध्ये ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये भारताचे उच्च आयुक्त अधिकारी म्हणून कार्यरत होते.

हे ही वाचा :

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

WTC Final : न्यूझीलंडला हरवून 17 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची टीम इंडियाला संधी! विराट मैदान मारणार?

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(Indian Born Cricketer Duleepsinhji Played FOr England Todays is his Birthday)