AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम सामना खेळवण्यात आला होता. हा सामना जिंकत टीम इंडियाने 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता.

Team India | टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा
| Updated on: Apr 06, 2023 | 2:16 AM
Share

मुंबई | सध्या सर्वत्र आयपीएल 16 व्या मोसमाची क्रेझ पाहायला मिळतेय. या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात झाली. आतापर्यंत यशस्वीपणे 8 सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. कोरोनानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधांविना या मोसमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच जिओ सिनेमावर क्रिकेट चाहत्यांना एकूण 12 भाषांमध्ये लाईव्ह क्रिकेट सामन्यासह कमेंट्री ऐकता येणार आहे.  त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. मात्र यादरम्यान एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. यामुळे क्रीडा विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. टीम इंडियाकडून 3 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलेल्या आणि त्यानंतर पीच क्युरेटरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेल्या मराठमोळ्या सुधीर नाईक यांची वयाच्या 78 व्या वर्षी प्राणज्योत मावळली आहे.

सुधीर नाईक हे काही दिवसांपूर्वी 26 मार्च रोजी आपल्या राहत्या घरी पडले. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्याकडून उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नाईक यांनी 5 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला.

सुधीर नाईक यांची क्रिकेट कारकीर्द

सुधीर नाईक यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी इंग्लंड विरुद्ध एडजबस्टन इथे कसोटी पदार्पण केलं होतं. त्यांची कसोटी कारकीर्द ही फारशी मोठी राहिली नाही. त्यांनी 3 कसोटींमधील 6 डावात 141 धावा केल्या. 77 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.

तसेच सुधीर नाईक यांनी 2 एकदिवसीय सामन्यांमध्येही भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 13 जुलै 1974 रोजी वनडे डेब्यू केला. नाईक यांनी पदार्पणाच्या सामन्यात चौकार ठोकत मोठा कारनामा केला. नाईक हे टीम इंडियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौकार मारणारे पहिले फलंदाज ठरले. नाईक यांनी एकूण 2 वनडेंमध्ये 38 धावा केल्या.

मुंबईचं कर्णधारपद

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली. सुधीर नाईक यांनी 85 प्रथम श्रेणी सामन्यांमधील 139 डावात 4 हजार 376 धावा केल्या. यामध्ये 7 शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश होता. तर 200 नाबाद ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. विशेष बाब म्हणजे त्यांनी रणजी ट्रॉफीत मुंबईचं नेतृत्वही केलं होतं. नाईक यांनी मुंबईला 1970-71 साली रणजी ट्रॉफीत विजयी करुन देण्यात मोठं योगदान दिलं होतं.

यशस्वी पीच क्युरेटर

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही नाईक यांची मैदानाशी असलेली नाळ तुटली नाही. नाईक यांनी त्यानंतर पीच क्युरेटर म्हणून जबाबदारी सांभाळली. नाईक हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे मुख्य पीच क्युरेटर होते. सामन्याला साजेशी खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी ही पीच क्युरेटरची असते. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम सामना खेळवण्यात आला होता. हा सामना जिंकत टीम इंडियाने 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता. हा सामना ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला, ती खेळपट्टी नाईक यांनी तयार केली होती.

क्रिकेट विश्वात हळहळ

दरम्यान नाईक यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.